Pune Unseasonal Rain Update:  Saamtv
मुंबई/पुणे

Pune News: पहिल्याच पावसात ड्रेनेज तुंबले! रस्त्यांवर पाणीच पाणी, पुणेकरांचे हाल; पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

Gangappa Pujari

सागर आव्हाड, पुणे|ता: १२ मे २०२४

गेल्या दोन दिवसांपासून पुणे शहर परिसरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. सायंकाळी ऑफिसवाल्यांची घराकडे जाण्यासाठी लगबग सुरू असतानाच पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांचे चांगलेच हाल झाले. कडक उन्हाळ्यात पडलेल्या या पावसाने पुणेकरांना गारवा दिला खरा मात्र पहिल्याच पावसात शहरातील ड्रेनेज तुंबल्याने रस्त्यावर पाणीच पाणी साचल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

पुणे शहरातील वडगावशेरी परिसरात पहिल्याच पावसात रस्ते आणि पावसाची वाहिनी तुंबल्याने नागरिकांची मोठी दैना झाल्याचे चित्र समोर आले. पाऊस पडून गेल्यानंतर तिसऱ्या दिवशीही शहरात काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचलेले आहे. परंतु पुणे महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तुंबलेले पाणी काढले नसल्याने वाहनचालक आणि नागरिकांकडून संताप व्यक्त केला आहे.

पुणे महानगरपालिका आयुक्तांनी नाले आणि ड्रेनेज साफसफाई करण्यासाठी सहाय्यक आयुक्त आणि ठेकेदारांना १५ मेपर्यंतची मुदत दिली होती. मात्र उन्हाळ्याच्या पहिल्याच पावसात वडगावशेरी मतदारसंघात सर्वत्र रस्त्यावर पाणी साचल्याने विकास कामाचा फज्जा उडाला असल्याचे पाहायला मिळाले. येरवडा येथील अग्रसेन शाळेच्या पाठीमागील रस्त्यावर तीन दिवस झाले पाणी साचलेले आहे. यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

शहरात अनेक भागात पाणी साचल्याचे दिसत असतानाही महापालिका अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहे. या ठिकाणी कोणती सुविधा नसताना श्रेय घेण्यासाठी रस्ता सुरू करण्यात आला आहे. मात्र पावसाळ्यात या रस्त्यावर पाणी साचत आहे. दुसरीकडे विमानतळ मार्गावर हीच परिस्थिती दिसून आली आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Job: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; मिळणार १४२००० पगार; असा करा अर्ज

Salman Khan News: 'बाबा सिद्दीकींपेक्षा वाईट हाल...', सलमान खानला पुन्हा धमकी; ५ कोटींची मागणी

Maharashtra News Live Updates: नाशिकमधील भाजपचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर

Shocking Video: कशासाठी? पोटासाठी..! चार पैसे कमावण्यासाठी जीव धोक्यात, मजुराचा VIDEO पाहून विचारात पडाल

Jayant Patil: शरद पवारांचे मुख्यमंत्री जयंत पाटील? पाटलांवर येणार मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT