Pune Unnatural Act on Dog Saam Tv News
मुंबई/पुणे

Pune News : पाळीव कुत्रीला खाण्याचं आमिष, पुण्यात तरुणाकडून श्वानावर अनैसर्गिक कृत्य; संतापजनक प्रकार CCTV मध्ये कैद

Pune Crime News : पुण्यातून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. पश्चिम बंगालमधील एका २० वर्षीय तरुणाने एका श्वानावर अनैसर्गिक कृत्य केल्याचं समोर आलं आहे. या तरुणावर काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Prashant Patil

पुणे : पुण्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. पश्चिम बंगालमध्ये राहाणाऱ्या एका तरुणाने हे संतापजनक कृत्य केलं आहे. हल्लीमुद्दीन अमिनल शेख असं या तरुणाचं नाव आहे. त्याने एका श्वानाला खाण्याचं आमिष दाखवून त्याच्यावर अनैसर्गिक कृत्य केलंय. पुण्यातील काळेपडळ पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हल्लीमुद्दीन अमिनल शेख (वय २०) हा मूळचा कांदोरी, जिल्हा मुर्शिदाबाद पश्चिम बंगालमधला आहे. त्याच्याविरोधात फिर्याद देण्यात आली होती. आरोपी हा फिर्यादी यांच्या शेजारील गोडाऊन मध्ये काम करत होता. फिर्यादी हे त्यांच्या स्वत:च्या मूळ गावी गेले असताना आरोपी ने २६ मार्च रोजी रात्री ११.३०च्या सुमारास अनाधिकृतपणे फिर्यादी त्यांच्या पार्किंगमध्ये येऊन फिर्यादी यांची कुत्री (श्वान) पेनी हिच्याशी अनैसर्गिक कृत्य केल्याचं सांगण्यात आलं असून आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे. या प्रकरणी ४१ वर्षीय व्यक्तीने पोलिसात तक्रार दिली आहे. चौकशी दरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याने फिर्यादी यांची तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे.

पुण्यातील नामांकित बिझनेसमॅनला पाकिस्तानमधून खंडणीचा फोन

दरम्यान, पुण्यात गुन्हेगारीचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढत चाललं आहे. त्याचदरम्यान, शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली. पुण्यातील एका नामांकित व्यावसायिकाला थेट पाकिस्तानातून धमकी आल्याचं समोर आलं. धक्कादायक बाब म्हणजे, या व्यावसायिकाकडून तब्बल ५ कोटी रुपयांची खंडणी मागितली असल्याचा प्रकार समोर आलाय. पुण्यातील उच्चभ्रू असलेल्या बोट क्लब रोड परिसरातील ही घटना असून ही खंडणी व्हॉट्सॲप मेसेजद्वारे मागण्यात आलीय.

३७ वर्षीय व्यावसायिकाने याबाबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. या प्रकरणी एका अनोळखी आणि अज्ञात मोबाईल धारकांवर कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनं पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. सर्व व्यावसायिकांचं देखील टेन्शन आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohini Khadse: कोण आहे रोहिणी खडसे? जाणून घ्या त्यांच्याविषयी

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

SCROLL FOR NEXT