Shocking Pune Accident Saam
मुंबई/पुणे

ट्रक भरधाव वेगात आला अन् वाहनांना उडवत गेला, पुण्यात भीषण अपघाताचा थरार

Shocking Pune Accident: पुण्यात पहाटे सिंहगड रोडवर भीषण अपघात घडला आहे. नियंत्रण सुटलेल्या ट्रकचालकाने तीन वाहनांना धडक दिली.

Bhagyashree Kamble

  • पुण्यातील सिंहगड रोडवर भीषण अपघाताची घटना घडली.

  • ट्रकचालकाने तीन वाहनांना धडक दिली.

  • दोन वाहनचालक किरकोळ जखमी.

पुण्यातून अपघाताची धक्कादायक बातमी समोर येत आहे. ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे भीषण अपघात घडला आहे. या अपघातात एकूण तीन वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच २ वाहनचालक गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच उत्तर प्रदेश येथील ट्रकचालक तौफिक इसरार अहमद याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मंगळवारी पहाटेच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. पुण्यात फरशा घेऊन ट्रक कात्रज चौकाकडून नवले पुलाच्या दिशेनं जात होते. या दरम्यान, ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटलेल्या ट्रकने तीन वाहनांना धडक दिली. या विचित्र अपघातात तीन वाहनांचे नुकसान झाले. या भीषण अपघातात दोन वाहनचालक किरकोळ जखमी झाले आहेत.

पुण्यात फरश्या घेऊन कात्रज चौकाकडून नवले पुलाच्या दिशेने निघालेल्या ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून विचित्र अपघात घडला. या अपघातात एकूण तीन वाहनांचे नुकसान झाले आहे. ट्रकने रेडिमिक्स डंपर वाहनाला तसेच दोन कारला जोराची धडक दिली. या तीनही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या साहाय्याने बाजूला केली. या प्रकरणी पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. तपास करून पोलिसांनी ट्रकचालक आरोपी तौफिक इसरार अहमदला ताब्यात घेतलं आहे. पुढील तपास सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे आणि सरकार मधील कोंडी उपोषणाच्या 12 व्या दिवशीही कायम

Bigg Boss 20 : पहिल्या आठवड्यात नॉमिनेट झाले 'हे' स्पर्धक; घराला कोण करणार टाटा-बाय बाय? खेळाची रंगत वाढतेय

Ladki Bahin Yojana: 'या' महिलांच्या खात्यात जमा होणार ऑगस्टचे ₹१५००; यांचे पैसे कायमचे होणार बंद, पाहा महत्त्वाची अपडेट

Hemraj Shah : मोठी बातमी! ठाकरेसेनेच्या नेत्याचे मुंबईत निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

मोठी बातमी: लंडनमध्ये ऐनवेळी विमानांचे मार्ग बदलले! उपमुख्यमंत्र्यांचे ६ अधिकारी स्वित्झर्लंडमध्ये अडकले; काय घडलं?

SCROLL FOR NEXT