Pune Lift Accident Saam Tv
मुंबई/पुणे

Pune: सातव्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली, तरुणाचा जागीच मृत्यू, चेअरमनसह ११ जणांवर गुन्हा

Pune Lift Accident: पुण्यामध्ये सातव्या मजल्यावरून लिफ्ट कोसळून तरुणाचा मृत्यू झाला. हा तरुण खाली येत असताना सातव्या आणि सहाव्या मजल्याच्या मधोमध अडकला. त्याला वाचवत असताना दोर तुटला आणि लिफ्ट कोसळली.

Priya More

Summary -

  • पुण्यात लिफ्ट कोसळून तरुणाचा मृत्यू

  • तळेगाव दाभाडे येथील निसर्ग सोसायटीत घटना

  • लिफ्टचा रोप तुटल्याने लिफ्ट सातव्या मजल्यावरून खाली कोसळली

  • याप्रकरणी चेअरमनसह ११ जणांवर गुन्हा दाखल

पुण्यामध्ये सातव्या मजल्यावरून लिफ्ट कोसळून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. पिंपरी-चिंचवडच्या तळेगाव दाभाडेमध्ये ही घटना घडली. या प्रकरणी सोसायटीच्या चेअरमनसह ११ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव दाभाडे पोलिसांनी ही कारवाई केली. लिफ्टची देखभाल न केल्याचा ठपका ठेवत या सर्वांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडच्या तळेगाव दाभाडे येथील निसर्ग हाऊसिंग सोसायटीमध्ये ही घटना घडली. दिनेश सुरंगे असं लिफ्ट दुर्घटनेच मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. दिनेश लिफ्टमधून खाली जात होता. त्याचवेळी अचानक सहाव्या आणि सातव्या मजल्याच्या मधोमध लिफ्ट अडकली. लिफ्टमध्ये अडकलेला दिनेश बचाव करण्यासाठी जिवाचा आकांत करत होता. यावेळी लिफ्टमध्ये अडकलेल्या दिनेशला वाचवण्यासाठी सोसायटीमधील नागरिक प्रयत्न करत होते. तेवढ्यात जोरात आवाड झाला आणि लिफ्टचा रोप तुटला. त्यामुळे लिफ्ट थेट खाली कोसळली.

सहाव्या मजल्यावरून लिफ्ट जोराने खाली कोसळल्यामुळे दिनेश गंभीर जखमी झाला होता. त्याला तात्काळ नजीकच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. पण डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषीत केले. जास्त रक्तस्राव झाल्यामुळे दिनेशचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर दिनेशच्या भावाने तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी सोसायटीच्या चेअरमन पुंडलिक वारके यांच्यासह ११ जणांविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सोसायटीच्या कमिटीच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप केला जात आहे. सोसायटीमध्ये राहणाऱ्या नागिरकांनी सांगितले की, 'निसर्ग हाऊसिंग सोसायटीची लिफ्ट गेल्या अनेक दिवसांपासून खराब होती. लिफ्ट व्यवस्थित चालू नव्हती, ती खाली किंवा वर जाताना आवज येत होता. पण कुणीच त्याला गांभीर्याने घेतलं नाही.' दिनेशच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: ‘मी ड्रायव्हर आहे, नोकर नाही’, सिगारेट ओढणाऱ्या प्रवाशाला ड्रायव्हरने टॅक्सीतून उतरवलं, व्हिडीओ झाला व्हायरल

Maharashtra News Live Update: पाकिस्तानी गँगस्टर शहबाज भट्टीसोबत लिंक असल्याच्या माहितीवरून दहा तरुणांना नागपूर ATS ने घेतलं ताब्यात

Bhootam Bhayyam: 'भूतम भयम्'साठी छाया कदम यांचे भन्नाट ट्रान्सफॉर्मेशन; 'जठाई'चा लूक पाहून व्हाल थक्क

स्मार्ट मीटर बसण्यापूर्वीच ४४० व्होल्टचा झटका; पाठवलं ५ महिन्यांचं वीजबिल, धक्कादायक प्रकरणाने राज्यात खळबळ

Shocking: नामांकित कोचिंग क्लासेसच्या संचालकांची आत्महत्या, चिंचेच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

SCROLL FOR NEXT