Pune Crime News Saam Tv News
मुंबई/पुणे

Pune Crime: पुण्यात खाकी पॅटर्न! जिथं माज दाखवला, तिथंच उतरवला; हवालदाराला मारहाण करणाऱ्या तरुणाची काढली धिंड

Pune crime news update: पोलीस हवालदाराच्या डोक्यात दगड घालून पळ काढणार्‍या तरूणाला पोलिसांनी खाकी पॅटर्न दाखवला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करत त्याची धिंड काढली आहे. तसंच त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केलाय.

Bhagyashree Kamble

पोलिसाच्या डोक्यात दगड घालून पळ काढणार्‍या तरूणाला पोलिसांनी खाकी पॅटर्न दाखवला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करत त्याची धिंड काढली आहे. पुण्यातील भेकराईनगर येथे सासवड रस्त्यावर या आरोपीनं वाहतूक पोलिसांवर दगडफेक केली होती. या घटनेत पोलीस हवालदार राजे गणपत नाईक हे गंभीर जखमी झाले होते. यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपीला ताब्यात घेत त्याची धिंड काढली आहे. तसेच त्याच्याविरोधात काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस हवालदार नाईक वाहतूक शाखेत नियुक्तीस आहेत. गुरूवारी सायंकाळच्या सुमारास सासवड रस्त्यावरील भेकराईनगर परिसरात नाईक वाहतूक नियंत्रण करत होते. यादरम्यान, दुचाकीस्वार बबलू मासाळ रस्त्यावर थांबून मोबाईलवर बोलत होता. बबलूमुळे वाहतूक विस्कळीत झाली होती.

नाईक यांनी बबलूला बाजूला होण्यास सांगितले. बबलूला राग अनावर झाल्यानं त्यानं हवालदार नाईक यांना धक्काबुक्की केली. नंतर डोक्यात दगड घातला आणि पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या हवालदार नाईक यांना तातडीनं खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं. या हल्ल्याचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

पोलिसांवर हल्ला केल्यानंतर मासाळ त्याच्या मुळगावी धाराशिवला पसार झाला. तो कामानिमित्त पुण्यात वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकानं धाराशिवमधून बबलूला अटक केलीय. तसेच भेकराईनगर परिसरातून त्याची धिंड काढण्यात आली आहे. या घटनेनंतर पोलिसांच्या खाकी पॅटर्नची चर्चा परिसरात होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आक्रमक; हेक्टरी 1 लाख, शेतमजुरांना 25 हजारांची मदतीची मागणी

Migraine Home Remedies: डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास होताच करा 'हे' ७ घरगुती उपाय; मिळू शकतो झटपट आराम

महाराष्ट्रात IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; 2 अधिकाऱ्यांची मंत्रालयातच नियुक्ती, कोणाला कुठे जबाबदारी?

Home Remedies : व्हाईट सॉक्स दिसतील एकदम नवीन! घाणेरडे मोजे स्वच्छ करण्याच्या सोप्या घरगुती टिप्स

Formal Pants For Woman: महिलांसाठी फॉर्मल पॅन्टचे 5 लेटेस्ट डिझाईन्स; ऑफिस लूकसाठी बेस्ट

SCROLL FOR NEXT