Pune Traffic News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Traffic News : शिवजयंती निमित्त पुण्यात वाहतुकीत मोठे बदल; कुठून निघणार मिरवणूक, कसा कराल प्रवास? वाचा

Shiv Jayanti In Pune : पुण्यात उद्या (१९ फेब्रुवारी) शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर मिरवणुका निघणार आहेत. यामुळे पीएमपी मार्गात वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत. शहरात वाहतुकीत काय बदल करण्यात येणार आहेत? जाणून घ्या.

Yash Shirke

सचिन जाधव, साम टीव्ही, प्रतिनिधी

Shivjayanti Pune News : दरवर्षी पुण्यात शिवजयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. उद्याही पुणे शहर आणि परिसरात शिवजंयती साजरी केली जाणार आहे. या निमित्ताने पुण्यात उद्या (१९ फेब्रुवारी) पीएमपी मार्गात बदल करण्यात आले आहेत. भवानी पेठेतील भवानी माता मंदिर येथून शिव प्रतिमेची मिरवणूक निघणार आहे.

शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, लक्ष्मी रस्ता इथून मिरवणुका निघत असल्यामुळे पोलिसांनी वाहतुकीमध्ये बदल केले आहेत. उद्या दुपारी चारच्या सुमारास भवानी माता मंदिराकडून शिवाजी महाराज यांची मिरवणूक निघणार आहे. छत्रपती शिवाजी पुतळा येथे मिरवणुकीची सांगता होणार आहे.

या मिरवणुकीमुळे शिवाजी रस्ता आणि लक्ष्मी रस्ता या मार्गांवरुन जाणाऱ्या बसचा मार्ग बदलण्यात येणार आहे. या दोन्ही मार्गांवरील बसेस जंगली महाराज रस्ता, डेक्कन टिळक चौकाच्या पुढे कुमठेकर रस्ता, विश्रामबागवाड मंडई मार्गे स्वारगेट चौकात येऊन पुढे नेहमीच्या मार्गाने जातील.

लक्ष्मी रस्ता वाहतुकीस बंद झाल्यावर या मार्गावरील बस पुणे स्टेशन मार्गे पोलीस आयुक्त कार्यालय महात्मा गांधी व स्थानक गोळीबार मैदान स्वारगेट व पुढे नेहमीच्या मार्गाने जातील. फडके हळद दारूवाला फुल वाहतुकीस बंद झाल्यानंतर या मार्गावर बस पुणे स्टेशन कडे जाताना कुंभारवाडा जुना बाजार मंगळवार पेठ या मार्गाने जातील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BJP आमदाराच्या नावाचं बनावट लेटरहेड; मंजूर कामाऐवजी काढला नव्या कामांचा GR, शिंदे सेनेच्या माजी आमदाराचा कारनामा

शाळेच्या सहलीला गेले, ५५-६० विद्यार्थ्यांना विषबाधा; ठाण्यातील घटनेने खळबळ, पालकांमध्ये भीती

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून रामरक्षा पठण आणि महाआरती

Akkha Masoor Masala Recipe: घरीच बनवा हॉटेलस्टाईल स्वादिष्ट अख्खा मसूर मसाला; जाणून घ्या सोपी रेसिपी

Healthy Diet : कडधान्य की पालेभाज्या? पावसाळ्यात शरीरासाठी काय योग्य, वाचा

SCROLL FOR NEXT