Pune Traffic News  Saam TV
मुंबई/पुणे

Pune Traffic News : पुण्यातील वाहतूक कोंडी कायमची मिटणार? महापालिकेच्या अर्थसंकल्पात १४०० कोटी रुपयांची तरतूद

Pune News : सिमला ऑफिस ते आनंद ऋषिजी चौक, कात्रज कोंढवा गंगाधाम चौक ते शत्रुंजय मंदिर चौक २४ मीटर रस्ता, वारजे शिवणे नदीकाठचा रस्ता अशा अनेक रस्त्यासाठी भूसंपादन प्रस्ताव करण्यात आला आहे.

साम टिव्ही ब्युरो

अक्षय बडवे

Pune :

पुण्यात वाहतूक कोंडीची समस्या मोठी डोकेदुखी ठरत आहे. विविध उपाययोजन करून देखील वाहतूक कोंडी दिवसंदिवस वाढतच चालली आहे. अशात आता पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी १४०० कोटी रुपयांची तरतूद महापालिकेच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. पुणे महानगरपालिकेचा अर्थसंकल्प काल सादर करण्यात आला. त्यावेळी त्यात ही तरतूद करण्यात आली.

यामार्फत पुढील वर्षभरात विकास आराखड्यात प्रस्तावित असलेले व अर्धवट असलेल्या ३३ रस्‍त्यांचे भूसंपादन केले जाणार आहे. यासाठी विविध ठिकाणी उड्डाणपूल, समतल विगलक (ग्रेड सेपरेटर) बांधणे यासाठी १४०० कोटी रुपयांची तरतूद महापालिकेच्या अर्थसंकल्पात काल सादर करण्यात आली. यामुळे वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मोठ्याप्रमाणावर मदत होणार आहे.

सिमला ऑफिस ते आनंद ऋषिजी चौक, कात्रज कोंढवा गंगाधाम चौक ते शत्रुंजय मंदिर चौक २४ मीटर रस्ता, वारजे शिवणे नदीकाठचा रस्ता अशा अनेक रस्त्यासाठी भूसंपादन प्रस्ताव करण्यात आला आहे.

मिळालेल्या निधितून रस्त्यांचे डांबरीकरण करणे यासाठी ६८९ कोटी रुपयांची तरतूद आहे. रस्ते विकसित करणे यासाठी १०५ कोटी रुपये. रस्ते पुन्हा डांबरीकरण करणे १५५ कोटी आणि रस्त्यांचे काँक्रिटीकरण करणे यासाठी १४ कोटी अशी इतर कामे केली जाणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT