...म्हणून मुलाने केला जन्मदात्या बापाचा खून; पुण्यातील धक्कादायक प्रकार  Saam Tv
मुंबई/पुणे

...म्हणून मुलाने केला जन्मदात्या बापाचा खून; पुण्यातील धक्कादायक प्रकार

धक्कादायक घटना पुण्यातील राजगुरूनगरात घडली आहे.

रोहिदास गाडगे

पुणे : म्हतारपणामध्ये वडिलांनी स्व:ताच्या लग्नाकरिता वधु- वर सुचक मंडळामध्ये विवाह (Marriage) नाव नोंदणी केल्यामुळे चिडून जाऊन मुलाकडून वयोवृध्द वडीलांचा (father) दगडाने ठेचुन खुन झाल्याची धक्कादायक घटना पुण्यातील (Pune) राजगुरूनगरात घडली आहे. शंकर रामभाउ बो-हाडे ( वय- ८०) रा, वैशांयपन आळी, राजगुरूनगर ता. खेड, असे खुन झालेल्याचे नाव आहे. याविषयी आरोपी (Accused) शेखर शंकर बो-हाडे (वय- ४७ ) याला पोलिसांनी (police) अटक (Arrested) केली आहे.

हे देखील पहा-

खून केल्याची कबुली आणि फिर्याद स्वःता आरोपीने पोलिस (police) ठाण्यात येऊन दिली आहे. या घटनेविषयी खेड (Khed) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर रामभाउ बो-हाडे यांनी परस्पर वधु- वर सुचक मंडळात पैसे भरून स्वत:च्या लग्नाची नोंदणी केली होती. याविषयी आरोपी मुलगा शेखर बो-हाडे यांच्याशी वडील शंकर बोऱ्हाडे खोटे बोलत असत.

या गोष्टीचा राग अनावर झाल्यामुळे शेखर बोऱ्हाडे यांने किचन रूममधील कांदा कापण्याची सुरी घेवुन वडीलांचा गळा कापण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, सुरीला धार नसल्यामुळे गळा कापला गेला नाही. घरात असलेल्या दगडी वरवंटयानेच वडील शंकर बोऱ्हाडे यांच्या तोंडावर व डोक्यात जोराचे प्रहार करून निर्घृण हत्या केली आहे. या घटनेचा पुढील तपास खेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक सतिश गुरव हे करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: साखरेच्या दरवाढीत २२ ते २५ हजार कोटींचा घोटाळा? राजू शेट्टींचा गंभीर आरोप

High cholesterol: फक्त आहारात या 5 पदार्थांचा करा समावेश; रक्तावाहिन्यांमध्ये साचलेली चरबी लगेच निघून जाईल

भाजप नेत्याचा 'हायटेक' कारनामा, एमटीएनएलच्या २० लाखांच्या केबलवर डल्ला; १३ जण गजाआड

Maharashtra Fort : कुछ तुफानी करते है! 'हा' किल्ला चढताना काळजाचा ठोका चुकतो, २,२५० फूट उंचीवरचा थरारक ट्रेक

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाआधी खुशखबर, कोणत्याही क्षणी खात्यात हप्ता जमा होणार; सरकारने घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT