Pune Weather Updates Saam TV
मुंबई/पुणे

Pune Weather Updates: पुणेकरांची उन्हापासून सुटका नाहीच; हवामान खात्यानं अंदाज वर्तवताना अलर्टही केलं

Pune Weather Updates: पुण्यातही मोठ्या प्रमाणात उन्हाचा कडाका जाणवत असून नागरिकांना घराबाहेर पडणं कठीण झालं आहे.

साम टिव्ही ब्युरो

Pune Weather Updates: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कमाल आणि किमान तापमानात मोठी चढउतार होत आहे. नागरिकांना कधी पावसाच्या सरी तर कधी उकाड्याचा सामना करावा लागत आहे. पुण्यातही मोठ्या प्रमाणात उन्हाचा कडाका जाणवत असून नागरिकांना घराबाहेर पडणं कठीण झालं आहे. अशातच हवामान खात्याने पुणेकरांसाठी पुन्हा एकदा अलर्ट दिला आहे. (Breaking Marathi News)

पुणे शहर (Pune News) व परिसरात आकाश दिवसभर निरभ्र राहणार असून, या काळात उन्हाचा कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ होण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. आठवडाभरापासून पुण्यासह राज्यभरातच उन्हाची तीव्रता वाढत असून, शहरातील कमाल तापमान जवळपास ४० अंश सेल्सिअसपर्यंत नोंदविले जात आहे.

बुधवारी शहरातील कमाल तापमान ३८.५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. पुढील काही दिवस शहरातीत कमाल तापमान (Weather) याच दरम्यान राहील. त्यामुळे उन्हाच्या चटक्यापासून वाचण्यासाठी पुणेकरांनी दुपारी बाहेर पडताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार सुरू आहे. मात्र पारा चाळिशी पार असल्याने उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे.

उन्हाचा चटका आणि उकाडा कायम आहे. आज (ता. १८) कमाल तापमानात चढ-उतार कायम राहण्याची शक्यता आहे. दरम्यान बंगालच्या उपसागरातील ‘मोचा’ चक्रीवादळ निवळल्यानंतर अंदमान, निकोबार बेट समुहावर नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) दाखल होण्यास पोषक हवामान झाले आहे. शुक्रवारपर्यंत (ता. १९) मॉन्सून दक्षिण बंगालचा उपसागर, दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटांवर दखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gudi Padwa 2026 : गुढीपाडव्याला सोनं खरेदी का करतात? आयुष्यात होतो 'हा' मोठा बदल

March End: मार्च संपण्याआधी ही कागदपत्रे जमा कराच, अन्यथा पगारातून होतील पैसे कट; वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update : नाशिक शहरात गॅस सिलेंडरचा काळाबाजार;7 जणांविरोधात गुन्हा दाखल

Gold Rate Today: गुढीपाडव्या आधी सोन्याने उच्चांक गाठला, सोनं १२००० रुपयांनी महागलं; वाचा आजचे २४ आणि २२ कॅरेटचे दर

Urine Infection Home Remedies: युरिन इन्फेक्शनचा त्रास होतोय? हे 5 घरगुती उपाय करा

SCROLL FOR NEXT