भाजपने पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ मुरलीधर गावडे यांना उमेदवारी दिली
गावडे हे कोल्हापूरच्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे CEO म्हणून कार्यरत आहेत.
शिक्षण क्षेत्रातील कामाचा अनुभव आणि शिक्षकांशी संबंधित प्रश्नांवरील भूमिकेमुळे त्यांचे नाव पुणे शिक्षक मतदारसंघासाठी चर्चेत आले.
सागर आव्हाड, साम प्रतिनिधी
पुणे शिक्षक मतदारसंघात महायुतीसमोर उमेदवारीवरून मोठा पेच निर्माण झाला होता. अखेर हा पेच सुटला असून कौतुभ गावडे यांना भाजपनं उमेदवारी दिलीय. पुणे शिक्षक मतदारसंघातून सचिन सानप देखील उमेदवारीसाठी इच्छुक होते.परंतु महायुतीत पुणे शिक्षक मतदारसंघाची जागा भाजपाच्या वाट्याला सुटल्यान भाजपनं कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी दिलीय. यानंतर कौस्तुभ गावडे कोण आहेत अशी चर्चा आता सुरू झालीय.
कौस्तुभ गावडे हे शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचे ते नातू आहेत. कोल्हापूर येथील 'श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था' येथे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. कौस्तभ गावडे हे शिक्षण क्षेत्राशी जोडलेले आहेत. त्यांना शिक्षकांच्या प्रश्नांची त्यांच्या अडचणींची जाण आहे.
कौस्तुभ गावडे हे उच्चविद्याविभूषित आहेत. त्यांनी 'एम.कॉम' (M.Com) आणि 'एमबीए' (MBA) शिक्षण पूर्ण केलंय. ते सध्या कोल्हापूर येथील 'श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था' येथे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून जबाबदारी सांभाळतायत. आजोबांच्या शैक्षणिक विचारांचा आणि कार्याचा वारसा त्यांना मिळाला आहे. प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या मार्गदर्शन मिळाले आहे.
कौस्तुभ गावडे यांचं शिक्षक, प्राध्यापक, संस्थाचालक आणि शैक्षणिक प्रशासन यांच्याशी त्यांची नाळ जोडलेली आहे. त्यांनी शिक्षकांच्या दैनंदिन अडचणी, शिक्षण संस्थांसमोरील प्रशासकीय व शैक्षणिक आव्हाने यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतलाय. त्यांच्या मते, शिक्षकांचे प्रश्न हे केवळ निवडणुकीचे मुद्दे नसून त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवाचा विषय आहेत. पुणे विभागातील शिक्षक संघटना आणि प्रतिनिधींशी सातत्यपूर्ण संवाद साधून शिक्षकांच्या हितासाठी एकत्र येण्याची भूमिका त्यांनी मांडलीय.
महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीही १९६५ मध्ये स्वर्गीय आमदार तात्यासाहेब सुळे यांनी स्थापन केलेली शिक्षक संघटना आहे. ही राज्यातील एक शिक्षक संघटना आहे. आतापर्यंत टीडीएफच्या माध्यमातून २० ते २२ आमदारांनी महाराष्ट्र विधानपरिषदेत शिक्षकांचे प्रतिनिधित्व केलंय. शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी संघटनेने आंदोलने आणि संपाच्या माध्यमातून सातत्याने लढा दिलाय. आता कौस्तुभ गावडे यांनी उमेदवारी देण्यात आलीय.
“पुणे विभाग शिक्षक मतदारसंघात याआधी टीडीएफ आणि स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था यांनी एकत्रितपणे निवडणूक लढवलीय. या माध्यमातून सलग तीन टर्म टीडीएफचे आमदार या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. यामध्ये दोन वेळा सुरेश पाटील, तर एकदा ऐनापुरे यांनी आमदार म्हणून काम केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.