पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी मनाई आदेश जारी
पिंपरी चिंचवड पोलिसांकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्बंध
पुणे विभाग शिक्षक पदवीधर निवडणुकीचे मतदान २३ ऑक्टोबरला
पुणे विभाग शिक्षक व पदवीधर निवडणुकीसाठी 23 ऑक्टोबर रोजी मतदान व 27 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. पार्श्वभूमीवर मतदान व मतमोजणी प्रक्रिया सुरळीत शांततेत पार पाडण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस प्रशासनाकडून विविध मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत.पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात एकूण २० मतदान केंद्र व ३५ बुथवर मतदान होणार आहे.
या आदेशान्वये प्रचार संपल्यानंतर मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंतच्या कालावधीत सर्व राजकीय व्यक्ती किंवा राजकीय पक्षांशी संबंधित कोणतीही व्यक्ती ते ज्या विधानपरिषद मतदारसंघाचे मतदार नाहीत त्या मतदारसंघात थांबण्यास, वास्तव्य करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०१३ चे कलम १६३ अन्वये पिंपरी चिंचवड कार्यक्षेत्रांतर्गत शस्त्र परवानाधारकांना शस्त्र ताब्यात ठेवण्यास व बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे तथापि छान आणि समितीने ज्यांना सवलत दिलेली आहे त्या शस्त्र परवानाधारकांना हा मनाई आदेश लागू होणार नाही. छाननी समितीने सवलत दिलेली असली तरीही निवडणुकीच्या कोणत्याही कार्यक्रमादरम्यान जवळ बाळगू नयेत.
मतदान व मतमोजणी प्रक्रिया होणाऱ्या ठिकाणापासून शंभर मीटर सभोवतालच्या परिसराच्या आतील सर्व व्यावसायिक दुकाने रेस्टॉरंट टपऱ्या स्थापना, अत्यावश्यक सेवा वगळून सर्व आस्थापना व तत्सम बाबी बंद ठेवाव्यात. मतदान केंद्र व परिसरात आतील भागात कोणत्याही प्रकारचे हत्यार अग्निशस्त्रे जवळ बाळगता येणार नाहीत हा आदेश कायदेशीर कर्तव्य बजावीत असलेल्या शासकीय अंमलदाराला लागू राहणार नाही.
मतदान केंद्रे व परिसरात मोबाईल फोन, लॅपटॉप व इतर इलेक्ट्रॉनिक यंत्रे वापरण्यास अगर घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश कर्तव्यावर असणाऱ्या अधिकारी- कर्मचाऱ्यांना लागू राहणार नाही. या आदेशांचे उल्लंघन करणारे व्यक्ती भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २२३ पात्र राहतील,असे पोलीस सह आयुक्त डॉ.शशिकांत महावरकर यांनी कळविले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.