Pune Police Viral Video News  Saam TV Marathi
मुंबई/पुणे

Pune Police : धक्कादायक! पुण्यातील लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्याला पोलिसांकडून मारहाण; CCTV मध्ये प्रकार कैद

Pune Police Viral Video News : तळेगावमध्ये लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्याला पोलिसांकडून मारहाण झाल्याचा आरोप समोर आला असून सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Namdeo Kumbhar

दिलीप कांबळे, मावळ प्रतिनिधी

Talegaon police assault law student CCTV video details : तळेगाव शहरात एका लॉ कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला पोलिसांकडून मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा CCTV व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे तळेगाव पोलीसांच्या वर्तणुकीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. कायद्याचे रक्षकच असे करत असतील, तर सर्वसामान्यांचं काय होणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे. या घटनेमुळे पोलीसांच्या वर्तणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तुषार दळवी हा लॉ कॉलेजमध्ये शिक्षण घेणारा विद्यार्थी दुपारी आपल्या मित्रांसोबत दुचाकीवर ट्रिपल सीट जात होता. त्यावेळी पोलिसांनी त्याला अडवले. त्यावेळी तुषारने आपल्याकडून चूक झाल्याचे मान्य करत, “जेवढा दंड असेल तो गाडीवर टाका” असे पोलिसांना म्हणाल्याचे सांगितले जात आहे. पण पोलिसांकडून त्याला अरेरावाची भाषा केली जात असल्याचं स्थानिकांनी सांगितलं. हा प्रकार एका दुकानाबाहेरील सीसीटीव्हीत कैद झालाय.

पोलिसांनी तुषार दळवी या तरूणाला शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या घटनेचा व्हिडिओ काढण्यास त्याने सुरुवात केली असता पोलिसांनी त्याला मारहाण केल्याचे CCTV फुटेजमध्ये दिसत असल्याचा दावा करण्यात येत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. तळेगाव पोलिसांच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत. या घटनेमुळे तळेगाव पोलीसांची प्रतिमा मलिन होत असल्याची चर्चा देखील शहरात रंगू लागली आहे. पुणे पोलिसांकडून या प्रकरणावर काय कारवाई केली जाणार? याची चर्चा सुरू झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kanya Pujan 2026 : कन्या पूजनासाठी मुलींचं वय किती असावं? २ ते १० वर्षांच्या कन्यांच्या पूजेचं धार्मिक महत्त्व जाणून घ्या

Maharashtra News Live Update: ठाण्यात उन्नत मार्गाचा लोखंडी सांगाडा कोसळला

Maharashtra Politics: भाजपची मोठी खेळी! शिंदेसेनेचा दिग्गज नेता फोडला, ५ नगरसेवक अन् २०० पदाधिकाऱ्यांसह हाती घेतलं कमळ

Skin Glow Drink : फक्त ७ दिवसांत ब्रायडल ग्लो हवाय? 'हे' सोपे अन् जादुई ड्रिंक पिऊन तर पाहा

Ladki Bahin Yojana : पुढच्या आठवड्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹१५०० जमा होणार? सप्टेंबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT