Pune Swargate Shivshahi Case Dattatray Gade Arrested 
मुंबई/पुणे

Dattatray Gade Arrested :दत्ता गाडे आत्महत्या करणार होता, पण गावकऱ्यांमुळे पोलिसांनी मुसक्या आवळल्या, मध्यरात्री नेमकं काय झालं?

Pune Swargate Shivshahi Case : दत्ता गाडे पोलीसांना शरण येत असताना घडलेला थरार गुनाट गावच्या ग्रामस्थांनी सांगितला. दत्ता गाडे टोकाचे पाऊल उचलणार होता, त्याचवेळी त्याला पकडण्यात यश आले.

Namdeo Kumbhar

Pune Swargate Shivshahi Case Dattatray Gade Arrested : स्वारगेट डेपोत शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरूणीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. शिरूरमधील गुनाट गावातून दत्तात्रय गाडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. गावकऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी दत्ता गाडे याला बेड्या ठोकल्या आहेत. दत्ता गाडे हा आत्महत्या करणार होता, अशी माहिती समोर आली आहे. दत्ता गाडे याने आयुष्य संपवण्यासाठी कीटकनाशकाची बॉटलही घेतली होती, पण गावकऱ्यांनी त्याला शरण जाण्यास भाग पाडल्याचे समजतेय. (Rape Accused Dattatray Gade Attempted Suicide, Arrested After Villagers Persuade Him)

दत्ता गाडे आयुष्य संपवण्याच्या तयारीत होता, पण...

पुण्यातील शिरुरच्या गुनाट गावच्या ग्रामस्थांच्या मदतीने पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे पुणे पोलिसांना शरण गेला. बलात्कार प्रकरणातील दडपण, ग्रामस्थांची भिती यातून आरोपी दत्ता गाडे आत्महत्या करण्याच्या तयारी होता.दत्ता गाडे टाकोचा पाऊल उचलणार होता, पण गुनाट ग्रामस्थांनी दत्ता गाडे याला बोलण्यात गुंतवले. दत्ता गाडे बोलण्यात गुंतवल्यानंतर गावकऱ्यांनी त्याला पकडले. त्यावेळी दत्ता गाडे याच्या हातात रोगर औषधाची बॉटल आढल्याचा दावा गुनाट गावकऱ्यांनी केला. दत्ता गाडे याच्या कृतीचे समर्थन नाही, मात्र गावची बदनामी आणि गावाला पोलीस छावणीचे आलेले रुप यामुळे ग्रामस्थ भयभीत होते, असेही काही गावकऱ्यांनी सांगितले.

पुण्याच्या शिरुर तालुक्यातील गुनाट गावात दत्ता गाडेची शोध मोहिम रात्रीच्या अंधारात सुरूच होती. ऊसाच्या शेतात डॉग स्कॉड , ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून रात्रीच्या अंधारातही दत्ता गाडे याचा शोध घेण्यात येत होता. त्याचवेळी दत्ता गाडे गावात आला, पाणी घेतलं आणि भिती व्यक्त करून पुन्हा शेतात लपला. ज्या घरात दत्ता गाडे पाणी प्यायला गेला, त्या घरातील एका महिलेने दत्ता गाडे याच्याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पुणे पोलीसांकडून ड्रोनच्या माध्यमातून दत्ता गाडे याला सरेंडर होण्याचे आव्हान केले. पण काही केल्या दत्ता गाडे पुढे येत नव्हता. गुनाट गावकऱ्यांनी पुढाकर घेत दत्ता गाडे याच्याशी संपर्क साधला अन् पोलिसांना स्वाधीन होण्यास त्याला भाग पाडले.

आरोपी दत्ता गाडेच्या अटकेचा थरार

- ज्या शेतात दत्ता गाडेला शोधण्यासाठी सर्च ॲापरेशन सुरु होतं तिथं तो नव्हताच, तिथं तो सापडलाच नाही

- दत्ता गाडे रात्री नोतेवाईक महेश बहीरट यांच्या घरी साडे दहा वाजता आला.

- त्यानंतर तो आल्याची माहीती नातेवाईकांनी पोलिसांना दिली.

- ⁠दत्ता गाडेने नातेवाईकांकडून पाण्याची बाटली घेतली. आणि माझी मोठी चुक झालीय, मला सरेंडर करायचं असं सांगून तिथून निघून गेला.

- ⁠त्यानंतर पोलीसांनी या घराच्या परीसरात दत्ता गाडेचा शोध सुरू केला. डॅाग स्कॅाड ही त्याठिकाणी आणले.

- ⁠पोलीसांना त्याचा बदलेला शर्ट सापडला , त्याचा वास डॅाग स्कॅाडला दिला.

- ⁠त्याआधारे डॅाग स्कॅाडने पुढील रस्ता पोलीसांना दाखवला , पण गाडे ज्या ठिकाणावरून आला होता, तिथे परतलाच नाही.

- ⁠तर तो नातेवाईकांच्या घराच्या परिसरात असलेल्या बेबी कॅनॅालमध्ये झोपून राहिला.

- ⁠याच ठीकाणी तो ग्रामस्थांना आढळला. ग्रामस्थांनी तो दत्ता गाडेच असल्याचं स्पष्ट केल्यानंतर पोलिसांनी दत्ता गाडेला तत्काळ ताब्यात घेतलं

- ⁠दत्ता गाडे ताब्यात आल्यानंतर पोलिसांनी लगेचच पुण्याकडे कुच केली

- ⁠स्वारगेट पोलीस ठाण्याच्या विशेष तपास पथकानं दत्ता गाडेला ताब्यात घेतलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT