swargate case संग्रहित छायाचित्र saam tv
मुंबई/पुणे

Swargate Deopt Case: शिवशाही बलात्कार प्रकरणात आणखी एक ट्विस्ट,आरोपीच्या वकिलाने केला नवा दावा

Pune Swargate Deopt Case : आरोपी दत्तात्रय गाडेच्या वकिलांनी पत्रकार परिषद घेत पोलीस सुरक्षेची मागणी केलीय. तसेच आरोपी आणि पीडितेबाबत केलेल्या दाव्यावरून युटर्न घेतलाय.

Bharat Jadhav

पुण्यातील स्वारगेट आगारात झालेल्या अत्याचार प्रकरणात नवं-नवीन ट्विस्ट येत आहेत. पीडितेला पैसे दिले होते असा दावा, अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याने केला होता. तोच धागा पकडत आरोपीचे वकिलांनाही पीडिता आणि आरोपींमध्ये पैशांचा व्यवहार केल्याचा दावा होता. मात्र आज आरोपीच्या वकिलांनी पत्रकार परिषद घेत त्या दाव्यावरून युटर्न घेतलाय. आरोपी आणि पीडितेत कोणताच आर्थिक व्यवहार झाला हे आम्ही बोललोच नाही असं वकिलांना सागितलंय.

आरोपी दत्तात्रय गाडेच्या वकिलांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी पोलीस सुरक्षा मागितलीय. आम्हाला पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी केलीय. तर पीडिता आणि आरोपी दत्तात्रय गाडे यांच्यात आर्थिक व्यवहार झाला नसल्याची माहितीही वकिलांनी दिलीय. पुणे पोलिसांनी आरोपी गाडेला अटक केल्यानंतर आरोपीने आपण अत्याचार केला नाहीये. संगममताने आपण शरीरसंबंध ठेवले होते. आपण पीडितेला पैसे दिले होते, असा दावा केला आरोपी दत्तात्रय गाडे याने केला होता.

तोच दावा वकिलांनी केला होता. बलात्कार प्रकरणातील नराधम दत्तात्रय गाडेला पुणे पोलिसांनी अटक केली. त्यानंतर आरोपीने गुन्ह्याची कबुली देण्याऐवजी पीडित तरुणीवरच खळबळजनक आरोप केले होते. संबंधित तरुणीवर कुठलीही बळजबरी केली नाही. तिनेच बोलावले आणि आम्ही बसमध्ये गेलो. तिने माझ्याकडून साडेसात हजार रुपये घेतले, त्यावेळी त्या ठिकाणी तरुणीचा एक एजंटही उपस्थित होता, असा दावा आरोपीने केला होता.

अटकेनंतर पोलिसांनी आरोपीने केलेल्या दाव्यावरून तपास सुरू केला. त्यावेळी धक्कादायक वास्तव समोर आलं. आरोपी दत्तात्रय गाडेच्या बँक खात्यात फक्त २३० रुपये होते. त्यानंतर आता आरोपी गाडेच्या वकिलांनी आज पत्रकार परिषद घेत नवा खुलासा करत या प्रकरणाला वळण दिलंय.

आज पुण्यात आरोपीचे वकिलांनी पत्रकार परिषद घेत आपल्याला पोलीस संरक्षण देण्यात यावे. अशी मागणी केलीय. त्याचवेळी त्यांनी आरोपी आणि पीडितमध्ये आर्थिक व्यवहार झाला असं विधान केलं नाही असा दावा वकिलांनी केलाय. तसेच स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणी पसरत असलेले नरेटीव्ह आरोपीच्या एका वकिलाने खोडून काढले आहेत. स्वारगेट प्रकरणात फेक नरेटीव्ह पसरत असल्याचे वृत्त माध्यमात प्रसिद्ध झाले होते.

मात्र पीडित तरुणी आणि आरोपी यांचे लोकेशन, आर्थिक व्यवहार आणि एकमेकांच्या ओळखीबद्दल केलेल्या दाव्यावर वकिलांचे कुठले ही स्पष्टीकरण केले नाहीये. पीडित तरुणी आणि आरोपी यांच्या ओळखीबद्दल अधिकृत वकिलांकडून कुठली ही बाजू मांडण्यात आलेली नाहीये.

आरोपीचे दावे काय?

पीडित तरुणीला महिनाभरापासून ओळखत होतो, असाही दावा दत्तात्रय गाडेने वकिलांमार्फत केला होता. त्यामुळे या दोघांच्या फोन कॉलची चौकशी करण्यात आली. पुणे पोलिसांनी आरोपी आणि पीडितेच्या मोबाईलचे दोन वर्षांचे सीडीआर डिटेल्स तपासले. परंतु दोघांमध्ये कोणताच संपर्क झाला नव्हता. आरोपी आणि पीडिता हे एकमेकांच्या संपर्कात नव्हते दिसून हे आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT