Pune Datta Gade Saam
मुंबई/पुणे

Pune Crime : शर्ट फाडला, लाथा बुक्क्यांनी मारहाण, अपहरण करुन घाटात नेलं; दत्ता गाडेच्या वकिलावर जीवघेणा हल्ला

Lawyer Sahil Dongre attack: स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गोडेच्या वकिलावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. दिवे घाटात नेत त्यांना मारहाण करण्यात आली आहे.

Bhagyashree Kamble

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेच्या वकिलांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. साहील डोंगरे असे आरोपी दत्ता गाडेच्या वकिलांचे नाव आहे. १७ मार्चला डोंगरे यांचे अपहरण करण्यात आले. मारहाण केल्यानंतर त्यांना घाटात सोडण्यात आले. जखमी अवस्थेत त्यांनी पोलीस ठाणे गाठले आणि आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. प्राणघातक हल्ल्याचं कारण अस्पष्ट असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

काही दिवसांपूर्वी पुण्यातील स्वारगेट डेपोमधील शिवशाही बसमध्ये बलात्काराची घटना घडली. २६ वर्षीय तरूणीवर बलात्कार प्रकरणी आरोपी दत्ता गाडे कोठडीत आहे. या प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याच्या वकिलावर आता प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी सायंकाळी त्याच्या वकिलाचं अपहरण करण्यात आलं.

वकिल डोंगरेला हडपसर येथून अपहरण करून बोपदेव घाटात नेण्यात आलं. वकिलाला मारहाण केल्यानंतर त्यांना दिवे घाटात सोडून दिलं. जखमी अवस्थेतच त्यांनी पोलीस ठाणे गाठले.

हडपसर पोलीस ठाण्यात गेल्यानंतर त्यांनी त्यांच्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती दिली. तसेच अज्ञात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. या हल्ल्याचं कारण अस्पष्ट असून, आरोपी दत्ता गाडेच्या वकिलावर हल्ला कुणी आणि का केला? याचा तपास पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्याला आज रेड अलर्ट, धो धो पाऊस कोसळणार

Saturday Horoscope : कष्टाचं फळ मिळणार, यश खेचून आणाल; ५ राशींच्या लोकांचे स्वप्न सत्यात उतरेल

Mobile Recharge: सरकार भरणार मोबाईलचं बिल? केंद्र सरकारची मोफत रिचार्ज योजना?

हनी ट्रॅपची इनसाईड स्टोरी, हनी ट्रॅपसाठी महिलेने कसा रचला सापळा?

Kolhapur News: 'महादेवी'साठी ग्रामस्थ आक्रमक, वनतारामध्ये 'महादेवी'ला नेण्यास विरोध

SCROLL FOR NEXT