Dattatray Gade swargate bus st depot case saam tv
मुंबई/पुणे

Pune ST Bus Depot: माझी इच्छा नसताना पुरूष डॉक्टरांकडून मेडिकल टेस्ट, बलात्कार पीडितेनं सांगितल्या वेदना

Pune Swargate: पुणे स्वारगेट बलात्कार प्रकरणी पीडित तरूणीने राज्याच्या प्रधान सचिवांना पत्र पाठवलं आहे. या पत्रात तिने अनेक खुलासे केले आहेत. तसेच या प्रकरणी अ‍ॅड. असीम सरोदे यांची नेमणूक करावी अशी मागणी तरूणीने केली आहे.

Bhagyashree Kamble

अक्षय बडवे, साम टीव्ही

पुण्यातील स्वारगेट बस स्थानक अत्याचार प्रकरणात पीडितेने अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. पीडित तरूणीने राज्याच्या प्रधान सचिवांना पत्र पाठवलं. या पत्रात पीडित तरूणीने वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच अत्याचार संदर्भात मोठा खुलासा केला आहे. यासह या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून असीम सरोदे यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणीही पीडित तरूणीने केली आहे.

संमतीशिवाय चाचणी

पत्रात पीडित तरूणीने, 'पुरूष वैद्यकीय अधिकारी इच्छा नसतानाही माझी संमती घ्यायचे, स्वतः माझी वैद्यकीय चाचणी करायचे. त्याचबरोबर पुरूष पोलीस अधिकारी देखील माझ्याकडे सतत चौकशी करत होते', असा आरोप तरूणीने केला आहे.

तिसऱ्यांदा अनैसर्गिकपणे..

'आरोपी दत्ता गाडेने माझ्यावर २ वेळा लैंगिक अत्याचार केला. दत्ता गाडेनं तिसऱ्यांदा अनैसर्गिकपणे बलात्काराचा प्रयत्न केला. यावेळी पूर्ण ताकदीनं मी विरोध केला. त्यानंतर दत्ता गाडे पळून गेला', असा खुलासा पीडित तरूणीने आपल्या पत्राद्वारे केली आहे.

आरडाओरडा केला पण..

घटनेदरम्यान तरूणीने आरडाओरडा केला, असं तिने पत्रात म्हटलं आहे. मात्र, त्यानंतर तरूणीचा आवाज खोल गेला. आवाजच निघत नव्हता. त्याचवेळी मनात विविध घटनांमधील बलात्कारदरम्यान विरोध केलेल्या, जखमी झालेल्या महिला डोळ्यांसमोर येत होत्या. त्यामुळे जीव वाचवणे महत्त्वाचे मानले, असं तरूणीने आपल्या पत्रात म्हटलं आहे.

असिम सरोदे यांची नेमणूक करावी

पुणे पोलिसांनी तरूणीला ३ वकिलांची नावे सांगितली. त्यातून १ वकील नेमू, असं तरूणीला सांगितलं. तरूणीने वकील असीम सरोदे यांना या प्रकरणात नेमणूक करावी, अशी मागणी केली. मात्र, एक दिवस उशीर झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. अन्यायग्रस्त तरूणी म्हणून माझ्या म्हणण्याला काहीच महत्त्व नाही का? असा सवालही तिने उपस्थित केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सीएसएमटीवर ७५ दिवसांचा ब्लॉक; आठ मेल-एक्स्प्रेस दादर, ठाण्यातच थांबणार

Whatsapp Account Imporatant Tips: एका छोट्याशा चुकीमुळे व्हॉट्सॲप अकाउंट बॅन होऊ शकते का?

Main Entrance Vastu Tips : घराच्या दरवाज्याजवळ चुकूनही 5 गोष्टी ठेवू नका; सकारात्मक ऊर्जा दूर राहील

Sangli Tourism : सांगलीत ५ विरंगुळ्याची ठिकाणे, पाऊल ठेवताच मन आपोआप होईल फ्रेश

तुकाराम मुंढेंचं आता थेट FDAमध्येच सर्जिकल स्ट्राइक; 15 अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT