Pune MBBS Student Goes Missing Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: रॅगिंगला कंटाळला, १४ दिवसांपासून MBBS चा विद्यार्थी बेपत्ता; पुण्यातील नामांकित कॉलेजमधील प्रकार

MBBS Student Goes Missing: पुण्यामध्ये एमबीबीएसचा विद्यार्थी गेल्या १४ दिवसांपासून बेपत्ता आहे. रॅगिंगच्या त्रासाला कंटाळून तो निघून गेल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

Priya More
  • पुण्यातील बी.जे मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थ्याचे रॅगिंग

  • रॅगिंगला कंटाळून विद्यार्थी बेपत्ता

  • गेल्या १४ दिवसांपासून विद्यार्थी बेपत्ता आहे

  • पोलिस त्याचा शोध घेत आहेत

सचिन जाधव, पुणे

पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बी. जे. मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थी रॅगिंगला कंटाळून बेपत्ता झाला आहे. गेले १४ दिवसांपासून हा विद्यार्थी बेपत्ता आहे. याप्रकरणी खराडी पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिस या विद्यार्थ्यांचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तन्मय अजयकुमार वंगे असे बेपत्ता झालेल्या विद्यार्थ्याचे नाव असून तो मुळचा कोल्हापूर जिल्ह्यातील आहे. पुणे रेल्वे स्टेशनवरून तो निघून गेल्याचे पालकाचे म्हणणे आहे. तन्मय बी. जे. मेडीकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत असून तो महाविदयालयाच्या वसतिगृहात रहाण्यास होता. कॉलेजमध्ये त्याच्या बॅचमधील स्थानिक विद्यार्थी ग्रुपकडून मानसिक त्रास, अपमानास्पद वागणूक, टोमणे मारणे, चिडवणे असे प्रकार होत असल्याची तक्रार तन्मयने पालकांडे केली होती.

तन्मयच्या बॅचमधील स्थानिक विद्यार्थी उत्कर्ष सिंग, श्रेया यादव आणि त्याच्या ग्रुपकडून होणाऱ्या रॅगिंगला कंटाळून महाविदयालय वसतिगृह सोडून गेल्याची तक्रार तन्मयच्या पालकांनी पुणे पोलिसांकडे केली. योग्य तो तपास करून तसेच दोषी विद्यार्थ्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी त्याच्या पालकांनी केली. तन्मय भेटत नसल्यामुळे त्यांचे कुटुंबीय चिंतेत आहेत.

आमच्या मुलाची कॉलेजमध्ये रॅगिंग झालेली असून सदर त्रासाला कंटाळून तो वसतिगृह आणि कॉलेज सोडून कोणालाही काहीही न सांगता निघून गेला असा आरोप तन्मयच्या कुटुंबीयांनी केला. याबाबत बी जे मेडिकल कॉलेजकडून कुठलीही समाधानकारक माहिती दिली जात नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update:काँग्रेस पक्ष सोडलेले देशातील पाच माजी मुख्यमंत्री काँग्रेसमध्ये 'घरवापसी' करणार?

Health Care : रात्रीचे जेवण आणि झोपण्यामध्ये किती अंतर असावे?

Sunday Horoscope : कामात नवी संधी मिळेल! ५ राशींच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होणार; वाचा रविवारचे राशीभविष्य

Sunday Horoscope: पैसा आणि नवी संधी, 'या' 4 राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट, वाचा रविवारच राशिभविष्य

काँग्रेसनं विदर्भात भाकरी फिरवली! नव्या नेत्याकडे सोपवली प्रभारी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी

SCROLL FOR NEXT