Pune Saam
मुंबई/पुणे

Shocking Crime: पुणे हादरलं! भरदुपारी ११ वर्षीय मुलीचं अपहरण, लॉजवर बलात्कार

Pune Crime News: पुण्यातील वारजे भागात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी लॉज मालकासह दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

Bhagyashree Kamble

पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरण ताजे असतानाच आणखी एका बलात्काराच्या घटनेमुळे पुणे हादरलं आहे. एका ११ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. ही धक्कादायक घटना पुण्यातील वारजे भागात घडली आहे. मुलगी भरदुपारी दुकानात गेली. नंतर दोघांनी मुलीचे अपहरण करून तिला लॉजवर नेत लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.

नेमकं घडलं काय?

२१ मार्चला दोन आरोपींना पोलिसांनी अपहरण आणि बलात्कार केल्याप्रकरणी अटक केली आहे. राहुल विनोदकुमार गौतम आणि त्याचा साथीदार मित्र अविनाश अशोक डोमपल्ले असे आरोपींचे नाव आहे.

दुपारी साडेबाराच्या दरम्यान अल्पवयीन मुलगी दुकानात निघाली होती. यावेळी दोघे आरोपी दुचारीवरून आले. नंतर दोघांनी मुलीला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून अपहरण केले. त्यानंतर लॉजवर नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. लैंगिक अत्याचार करत असतानाच राहुल गौतम या आरोपीने मुलीला धमकी दिली. 'तु माझ्याशी विवाह कर नाहीतर तुला मारून टाकेन' अशी धमकी दिली.

या घटनेची माहिती पीडित अल्पवयीन मुलीने आपल्या आई वडिलांना दिली. त्यांनी पोलीस ठाणे गाठत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी आरोपींसह लॉजचे मालक भगवान दत्ता मोरे आणि लॉजचा व्यवस्थापक टिकाराम चपाघई यांच्यावरही गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकूण ४ जणांना अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दहीहंडीत अश्लील नृत्य; डान्सर निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! २७ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT