Crime Saam tv
मुंबई/पुणे

Pune Crime: पुण्यात चाललंय काय? मामे भावासमोर तरूणीवर सामूहिक बलात्कार, VIDEO काढला; अन् मग..

Pune Crime Against Women: स्वारगेट बस डेपोत झालेलं बलात्कार प्रकरण ताजे असतानाच आणखी एका घटनेमुळे पुणे हादरलं आहे. एका तरूणीवर सामूहिक लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे.

Bhagyashree Kamble

पुण्यातील स्वारगेट बस डेपोत तरूणीसोबत झालेल्या अत्याचारानंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे. स्वारगेट बस डेपोत झालेलं बलात्कार प्रकरण ताजे असतानाच आणखी एका घटनेमुळे पुणे हादरलं आहे.

एका तरूणीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला आहे. ही संतापजनक घटना शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे घडली आहे. एका युवतीवर दोन नराधमांनी लैंगिक अत्याचार केला. नंतर तिच्या अंगावरील सोनं देखील लंपास केलं. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कारेगावात तरूणी आपल्या मामेभावासोबत गप्पा मारण्यासाठी बसली होती. वेळ रात्रीची होती. त्या ठिकाणी दोन आरोपी आले. अमोल पोटे आणि किशोर रामभाऊ काळे असं आरोपींचे नाव आहे. दोन्ही आरोपी मोटारसायकलवरून आले होते. ते दारूच्या नशेत असल्याची माहिती समोर आली आहे.

आरोपींनी आधी तरूणीला चाकूचा धाक दाखवला. नंतर तरूणीच्या मामेभावाला जबरदस्तीने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले आणि व्हिडिओ शुट केला. नंतर त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. नराधमांनी त्यानंतर आळीपाळीनं तरूणीसोबत लैंगिक अत्याचार केला.

नराधमांनी तरूणीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर त्यांनी तरूणीच्या गळ्यातील सोन्याची चैन, नाकातील रिंग आणि काही दागिने हिसकावून घेतले. नंतर आरोपी पसार झाले. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गुन्हा दाखल केला आणि आरोपींचा तपास करत त्यांच्या मुसक्या आवळल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleep Schedule: कधी लवकर तर कधी उशिरा झोपता? हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो परिणाम; जाणून घ्या 'या' ७ टिप्स

Shocking : धक्कादायक! ९ महिन्याचं बाळ धावत्या एक्सप्रेसच्या खिडकीतून पडले, नंतर जे घडलं त्याने काळजाचा ठोका चुकला

"मेंटेनन्स देणार नाही, काय करायचं ते करा" असं म्हणणाऱ्या फ्लॅटधारकांना झटका; सोसायटी करू शकते 'ही' कडक कायदेशीर कारवाई

Shivali Parab: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबचा साडीतील रॉयल लूक; पेस्टल गुलाबी-लाल साडीत दिसतेय अप्सरा

Maharashtra News Live Update: वाळूच्या डंपरची दुचाकीला जोरदार धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT