Bhagyashree Kamble
उन्ह तापलेलं असताना लालभडक रसाळ कलिंगड खायला कुणालाही आवडतं.
पण चकचकीत लाल रंगाचा कलिंगड नैसर्गिक आणि फ्रेश असेलच असे नाही.
लाल रंगाच्या कलिंगडाच्या जाळ्यात अडकण्याऐवजी नैसर्गिकरीत्या पिकवलेले कलिंगड खा.
पण नैसर्गिकरीत्या पिकलेला कलिंगड ओळखायचा कसं?
जमिनीला टेकलेला भाग नैसर्गिकरित्या किंचित पिवळसर असतो.
कलिंगडाचा लहानसा तुकडा पाण्यात टाका. जर पाणी गुलाबी झालं, तर कलिंगडाला कृत्रिम रंग लावलेला आहे हे समजा.
नैसर्गिक कलिंगडाच्या बिया तपकिरी आणि काळ्या रंगाच्या असतात. तसंच कलिंगड आतून लालसर असतेच पण ते कृत्रिम वाटत नाही.
कृत्रिम कलिंगडच्या बिया ह्या पांढऱ्या रंगाच्या असतात आणि आतून गडद लालसर दिसते.
वाशी फळ बाजारात कलिंगडाचे दर १ हजार ते दीड हजार रुपये प्रति क्विंटल दरम्यान आहेत.
आवक वाढल्यास दरात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांनी आकर्षक रंगावर न भुलता योग्य तपासणी करूनच कलिंगड घ्यावे.
NEXT: पालकांनो, मुलांना सोशल अॅक्टिव्ह आणि कॉन्फिडेन्ट बनवायचे असेल तर 'या' टिप्स करा फॉलो