ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
प्रत्येक पालकाला आपली मुलं प्रत्येक गोष्टीत आणि क्षेत्रात सर्वोत्तम असावे असे वाटते. त्यासाठी खूप मेहनत घेतात.
जर तुम्हालाही तुमच्या मुलाला सोशल अॅक्टिव्ह म्हणजेच सामाजिकदृष्ट्या सक्रिय करायचे असेल तर तुम्ही या टिप्स फॅालो करु शकता.
तुमच्या मुलांना स्पोर्ट्स क्लब आणि वेगवेगळ्या अॅक्टिव्हिटिजमध्ये सहभागी करून घ्या.
त्यांना कुटुंबाचे महत्त्व सांगा आणि नातेवाईक आणि लोकांशी मोकळेपणाने बोलायला शिकवा.
मुलांचे यश लहान असो कि मोठे त्यांचे कौतुक करायला विसरु नका.
त्यांना प्रत्येकवेळी नवीन गोष्टी करण्यास आणि शिकण्यास प्रेरित करा.
त्यांच्या भावनांचा आदर करा. आणि त्यांना इतरांच्या भावनांचा आदर करायला शिकवा.