ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कांदा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. कांदा अनेक गोष्टींवर रामबाण उपाय आहे. त्याचप्रमाणे कांदा केसांसाठी ही तितकाच फायदेशीर आहे.
जर तुमचेही केस गळत असेल हा कांद्यापासून बनणारा हा घरगुती हेअर मास्क एकदा नक्की ट्राय करा.
सर्वप्रथम एक मोठा कांदा किसून घ्या किंवा मिक्समध्ये वाटून गाळून घ्या.
यामध्ये २ चमचे एलोवेरा जेल मिक्स करा. यामुळे केस सॅाफ्ट होतील.
नंतर यामध्ये नारळाचे तेल आणि १ चमचा मध मिक्स करुन चांगवे एकत्रित करुन घ्या.
हा मास्क स्कॅल्पवर लावून हलका मसाज करा. ३० ते ४० मिनिटे ठेवून केस शॅम्पू लावून धुवा.
हा मास्क आठवड्यातून दोनदा लावा. यामुळे केस गळण्याची थांबतील. तसेच सॅाफ्ट आणि हेल्दी होतील.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.