ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
ऊकडलेले बटाटे, गव्हाचं पीठ,कांदा, किसलेले आलं लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, जीरे, तीखट,हळद, गरममसाला आणि मीठ
सर्वप्रथम तेल, मीठ आणि गरजेनुसार पाणी घालून पीठ मळून घ्या.
आलं - लसूण, हिरवी मिरची, आणि कोथिंबिर याची पेस्ट तयार करुन घ्या. आणि उकडलेले बटाटे सोलून घ्या.
एका कढईत तेल गरम करुन यात जीरे, कांदा, तयार केलेली आलं लसूण पेस्ट, मीठ, हळद , तिखट आणि उकडलेले बटाटे मॅश करुन अॅड करा.
सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करा. भाजी तयार झाल्यावर मिश्रण थंड करायला ठेवा.
पीठाचा एक गोळा घेऊन यात तयार केलेली स्टफिंग भरा आणि पराठा लाटून घ्या. गरम तव्यावर तेल किंवा तूप घालून पराठा दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्या.
चमचमीत टेस्टी आलू पराठा तयार आहे. दही, सॅास किंवा लोणच्यासोबत पराठ्याचा आनंद घ्या.