रोहिदास गाडगे, साम टिव्ही
पुणे : पुण्यातील शिरुर तालुक्यातील करडे गावातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. आज सकाळी तलाठी पवन बांदल यांचा मृतदेह विहिरीत पाण्यावर तरंगताना आढळला. कामावर जाताना तलाठी पवन बांदल यांनी 'विहिरीवरील मोटर पंप सुरू करून येतो', असं सांगून ते घराबाहेर पडले. मात्र, सायंकाळी त्यांचा मृतदेह विहिरीत पाण्यावर तरंगताना आढळला. त्यांचा मृत्यू विद्युत शॉकमुळे झाला की ही आत्महत्या आहे? याबाबत अद्याप संभ्रम कायम आहे. घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलीस आणि रेस्क्यु टीमच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात यश आलं आहे.
दरम्यान, पुणे शहरातील एका रहिवासी सोसायटीमध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण शहर हादरून गेले आहे. एका बाल्कनीतून फुलदाणी खाली पडून ती थेट खेळत असलेल्या एका लहान मुलाच्या डोक्यावर आदळते, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शहरातील कोथरूड परिसरात रविवारी दुपारी घडली आणि त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल (Viral Video) होत असलेल्या घटनेत तुम्ही पाहू शकता, शाळांना सुट्ट्या लागल्याने अनेक लहान मुल सोसायटीमध्ये खेळत आहेत. लहान मुलांमध्ये अनेक नागरिक ये-जा करत असतात. प्रत्येकजण खेळण्यात मग्न आहेत. तेवढ्याच खेळत असलेल्या एका मुलाच्या डोक्यात जोरदार एक कुंडी कोसळते आणि मुलगा जागीच जमिनीवर कोसळतो. घटनेनंतर क्षणात तेथे असलेले नागरिक त्याच्या जवळ धावत जातात. मात्र, चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला होता. ही घटना जवळील सीसीटीव्हीत कैद झाली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.