Pune teachers constituency election result 
मुंबई/पुणे

Pune MLC : दुसरी पसंती ठरवणार पुण्याचा शिक्षक आमदार, नेमकं गणित काय? निकालाआधीच सोप्या शब्दात समजून घ्या

Pune teachers constituency election result : पुणे विभाग शिक्षक आमदार मतदारसंघाची मतमोजणी २७ ऑक्टोबरला होणार आहे. यंदा ३० उमेदवार रिंगणात असल्याने पहिल्या पसंतीच्या मतांसोबत दुसऱ्या पसंतीची मतेही निर्णायक ठरू शकतात.

Namdeo Kumbhar

सागर आव्हाड, पुणे प्रतिनिधी

how second preference votes decide teacher MLC election : पुणे विभाग शिक्षक आमदार मतदारसंघाची मतमोजणी २७ ऑक्टोबरला पार पडणार आहे. यंदा भाजपचे कौस्तुभ गावडे, काँग्रेसचे जयंत आसगावकर, अपक्ष दत्तात्रय सावंत आणि शिवसेना पुरस्कृत सचिन सानप यांच्यासह एकूण ३० उमेदवार रिंगणात आहेत. मात्र, या निवडणुकीत केवळ पहिल्या पसंतीची आघाडी पुरेशी नसून, अंतिम निकाल 'दुसऱ्या पसंतीच्या' मतांवरच अवलंबून असणार आहे. (Pune teachers constituency election result)

पाच जिल्ह्यांतील राजकीय गणित

पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांतील शिक्षकांचे मतदान, शिक्षण संस्थांचे पाठबळ आणि शिक्षक संघटनांची ताकद या निवडणुकीत निर्णायक ठरेल. ३० उमेदवार मैदानात असल्याने मतांचे मोठे विभाजन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उमेदवाराची शिक्षकांच्या प्रश्नांवरील भूमिका आणि जिल्हानिहाय मतदान विजयाचे अंतर ठरवेल.

इतिहास काय सांगतो?

२०१४ आणि २०२० च्या निवडणुकांमध्ये पहिल्या पसंतीच्या मतांवर विजयाचा कोटा पूर्ण झाला नव्हता. त्यामुळे दोन्ही वेळा पसंतीक्रमानुसार झालेली मतमोजणीच निर्णायक ठरली.

२००२: गजेंद्र ऐनापुरे विजयी

२००८: भगवानराव साळुंखे विजयी

२०१४: दत्तात्रय सावंत विजयी (दुसऱ्या पसंतीक्रमाने)

२०२०: जयंत आसगावकर विजयी (दुसऱ्या पसंतीक्रमाने)

२०२० च्या निवडणुकीतील थरार: ३४ फेऱ्यांनंतर निकाल

मागील निवडणुकीत विजयासाठी २५,११४ मतांचा कोटा आवश्यक होता.

पहिल्या पसंतीक्रमात काँग्रेसच्या जयंत आसगावकर यांना १६,८७४ मते मिळाली, पण कोटा पूर्ण झाला नाही.

कमी मते मिळालेल्या उमेदवारांना एकापाठोपाठ एक बाद करत त्यांच्या मतपत्रिकांवरील दुसऱ्या पसंतीची मते मोजण्यात आली.

तब्बल ३३ फेऱ्यांनंतरही कोणाचाच कोटा पूर्ण झाला नव्हता.

अखेर ३४ व्या फेरीत तत्कालीन आमदार दत्तात्रय सावंत बाद झाल्यानंतर त्यांच्या मतपत्रिकांवरील दुसऱ्या पसंतीची मते जयंत आसगावकर यांच्याकडे वळाली.

यामुळे आसगावकर यांनी २५,९८५ मते मिळवून विजय मिळवला, तर सावंत १५,३५७ मतांवर रोखले गेले.

यंदा निकाल कसा ठरेल?

या निवडणुकीत पहिल्या पसंतीत कोण आघाडी घेतो, किती मते अवैध (बाद) ठरतात आणि आवश्यक कोटा पूर्ण न झाल्यास बाद झालेल्या उमेदवारांची दुसऱ्या पसंतीची मते कोणाकडे वळतात, यावरच नव्याने निवडून येणाऱ्या आमदाराचे नाव निश्चित होईल. कौस्तुभ गावडे, जयंत आसगावकर, दत्तात्रय सावंत आणि सचिन सानप या प्रमुख उमेदवारांपैकी इतरांच्या मतदारांचा 'दुसरा पसंतीक्रम' कोणाला मिळतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Garud Puran: मृत्युनंतर मृतदेहाच्या नाकात आणि कानात कापूस घालण्याची प्रथा का आहे? गरूड पुराणात सांगितलंय रहस्य

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांचा शिंदेंवर निशाणा; करिअर उद्ध्वस्त करण्याचा मोठा डाव असल्याचा आरोप

Besan Ladoo Recipe: दिवाळीला खमंग बेसनचे लाडू बनवणार आहात? 'ही' ट्रिक वापरा, लाडू वळताना तुटणार नाहीत!

Gold Price Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याच्या दरात मोठा बदल! २४, २२ आणि १८ कॅरेटचे नवे भाव वाचा

Rahul Gandhi Accident : राहुल गांधी यांच्या ताफ्याचा अपघात; ५ गाड्या आणि रुग्णवाहिकेची जोरदार धडक

SCROLL FOR NEXT