Pune Accident Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Accident: पुण्यात भीषण अपघात! टँकरने दिली दोन दुचाकीला धडक; दोघांचा जागीच मृत्यू

Pune News: पुण्यात भीषण अपघात! टँकरने दिली दोन दुचाकीला धडक; दोघांचा जागीच मृत्यू

Satish Kengar

Pune Accident News: पुण्यात एक भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. सासवडहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या टँकरने दोन दुचाकीला धडक दिल्याची माहिती मिळत आहे. या अपघातात दोन जण जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर दोन जण गंभीर जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, सासवडहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या टँकरने दोन दुचाकीला धडक दिली. यानंतर टँकर दिवे घाटामध्ये टँकर दरीत कोसळला. हा अपघात इतका भीषण होता की, दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात नेमका कसा झाला, याबाबत अधिक माहिती मिळू शकलेली नाही.

अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. या अपघातात जखमी झालेल्या दोघांना रुग्णालयात दाखल केले जात आहे.

Nandurbar Accident News: ट्रक-छोटा हत्तीची समोरासमोर धडक

नंदुरबारमध्येही आज एक भीषण अपघाताची  (Accident)  घटना घडली आहे. प्रकाशा गावाजवळ ट्रक व छोटा हत्ती गाडीत समोरासमोर जोरदार धडक होऊन तीन जण (Prakasha) जागीच ठार झाले.

अपघातातील वृद्ध व दहा वर्षीय मुलाला जिल्हा रुग्णालयात (Hospital) उपचारासाठी रवाना करण्यात आले. रविवारी (ता. ७) पहाटे साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: हळदीला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी व स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले, आज खरेदीचा 'गोल्डन चान्स'; 18K, 22K आणि 24K चे दर किती?

PM Kisan Yojana: या शेतकऱ्यांना कधीच मिळणार नाही ₹२०००; पीएम किसान योजनेबाबत महत्त्वाची अपडेट समोर

Solapur : नवऱ्याने बायकोला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं, एकांतात बोलायचे सांगून खोलीत नेलं, नंतर...

Mumbai To Kedarnath Travel: मुंबईहून केदारनाथ कसं जायचं? जाणून घ्या सर्वात सोपा मार्ग

SCROLL FOR NEXT