Indian Soldier dies Saam TV
मुंबई/पुणे

Indian Soldier dies : पुण्यातील ३८ वर्षीय जवानाचं मोहिमेला जाताना अपघाती निधन; निवृत्तीनंतरही करत होते देशसेवा

Pune News : पुण्यातील भवानी पेठेतील भवानी माता मंदिर परिसरात ओझरकर हे वास्तव्यास होते.

प्रविण वाकचौरे

Pune News :

भारतीय सैन्यदलातील जवान दिलीप बाळासाहेब ओझरकर (वय ३८ वर्ष) यांचं मोहिमेवर जाताना अपघाती निधन झालं आहे. कारगिल ते लेह मोहिमेवर जाताना प्रवासादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पुण्यातील भवानी पेठेतील भवानी माता मंदिर परिसरात ओझरकर हे वास्तव्यास होते.

दिलीप ओझरकर हवालदार पदावरून सैन्यदलातून निवृत्त झाले होते. मात्र त्यांनी पुन्हा कालावधी वाढवून देशसेवा करण्यास पसंती दिली. सराव मोहिमेसाठी जाताना ३ सप्टेंबर रोजी रविवारी दुपारी त्यांच्या वाहनाचा अपघात झाला. त्यात त्यांचं निधन झालं. (Latest Marathi News)

विमानाने त्यांचे पार्थिव लोहगाव विमानतळावर आणण्यात आले. त्यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या मागे आई, वडील,पत्नी, मुलगा, मुलगी आणि दोन भाऊ असा परिवार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: एकनाथ शिंदे नेस्को सेंटरकडे रवाना

Meloni Vs Trump : मेलोनी डोनाल्ड ट्रम्पवर संतापल्या; म्हणाल्या, मी कधीच कुणाकडे भीक मागत नाही!

Father’s Day Gift Ideas: फादर्स डे ला वडिलांच्या चेहऱ्यावर आणा हसू; हे ७ गिफ्ट आयडिया ठरतील बेस्ट

भीषण अपघात! 200 मीटर खोल दरीत वाहन कोसळून आग लागली; 5 जणांचा मृत्यू

Saputara Fort : सापुताऱ्याला ट्रिप प्लान करताय? मग 'हा' ऐतिहासिक किल्ला नक्की पाहा, अनुभवाल निसर्गाचा अद्भुत नजारा

SCROLL FOR NEXT