बंडातात्या कराडकर यांना दिसताच क्षणी ताब्यात घ्या, पुणे ग्रामीण पोलिसांचे आदेश Saam Tv
मुंबई/पुणे

बंडातात्या कराडकर यांना दिसताच क्षणी ताब्यात घ्या, पुणे ग्रामीण पोलिसांचे आदेश

पायीवारीसाठी आग्रही असणाऱ्या बंडातात्या कराडकर यांना दिसताच क्षणी ताब्यात घेण्याचे पोलीसांना आदेश देण्यात आले आहेत.

रोहिदास गाडगे

रोहिदास गाडगे

पुणे : पायीवारीसाठी आग्रही असणाऱ्या बंडातात्या कराडकर Bandatatya Karadkar यांना दिसताच क्षणी ताब्यात घेण्याचे पोलीसांना Police आदेश देण्यात आले आहेत. या अटकेबद्दल आळंदी Alandi आणि परिसरातील पोलीसांना पिंपरी चिंचवड Pimpari Chinchwad आयुक्तालयातुन वायरलेवर सुचना देण्यात आल्या आहेत. Pune Rural Police orders to arrest Bandatatya Karadkar

बंडातात्या कराडकर आळंदी परिसरात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. आषाढीवारी सोहळा पायी काढण्यासाठी बंडातात्या कराडकर आग्रही असल्याचेही दिसून आले होते.

हे देखील पहा-

वारीमध्ये कोरोनाचा शिरकाव !

काल 1 जुलै रोजी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे काही ठरावीक वारकऱ्यांच्या उपस्थितीत पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे. आता त्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी निघणार आहे. तत्पूर्वी मानाच्या दिंड्यांत सहभागी होणाऱ्या २२ वारकऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे आता माऊलींच्या पालखीला कोरोनाचे ग्रहण लागलेले दिसून येत आहे.

२६४ वारकऱ्याची RTPCR चाचणी करण्यात आली होती. त्यामध्ये २२ वारकरी कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले आहे. पॉझिटिव्ह २२ वारक-यांना महाळुंगे ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले आहे.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्यात कोरोना पुन्हा शिरकाव झाला आहे. प्रस्थान सोहळ्याला उपस्तिथी साठी आरटीपीसीआर केलेल्या ३६८ पैकी ३७ वारकऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आळंदी प्रस्थान सोहळ्यावर कोरोना चे संकट उदभवल्याचे दिसून येत आहे. Pune Rural Police orders to arrest Bandatatya Karadkar

दरम्यान, कठोर निर्बंध आषाढी वारीसाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आले आहेत. गर्दी न करण्याचं आवाहन कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी करण्यात आले आहे. वारीला सुरुवात होत असतानाच आता कोरोनानं शिरकाव केल्याची माहिती मिळत आहे. माऊलीच्या प्रस्थान सोहळ्यासाठी निवडण्यात आलेल्या १०० वारकऱ्यांपैकी २ जणांना कोरोनाची लागण झाली होती. ही माहिती मिळताच काहीसं गोंधळाचं वातावरण झाले होते. इतकेच नाही तर दर्शनासाठी आलेल्या लोकांपैकी २० जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.

माऊलीच्या दर्शनासाठी ५० लोकांना परवानगी टप्प्या टप्प्याने देण्यात आलेली होती. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यापैकी काल १६४ जणांचे रिपोर्ट आले होते. २० जणांना कोरोनाची लागण झाली होती. आज माऊलीचं प्रस्थान दुपारी होण्याची शक्यता असतानाच आता वारकऱ्यांची चिंता वाढली आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohtang Accident : भरधाव कार दरीत कोसळली; ४ जणांचा जागीच मृत्यू, वाहनाचा अक्षरश: चक्काचूर

Maharashtra Live News Update: प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारायणगडावर भक्तांनी घेतले विठुरायाचे दर्शन

Pune : पुण्यात कोयता, हातोड्याने मारहाण; कॉलेजमध्ये झाला राडा! हाणामारीचे Video Viral

Shahapur : अखेर चौथ्या दिवशी सापडला युवकाचा मृतदेह; भारंगी नदीत बुडून झाला मृत्यू

Skin Care: सतत खोट्या आयलॅशेस लावण्याने होतील हे नुकसान, वेळीच व्हा सावधान

SCROLL FOR NEXT