Pune Restaurants and Pubs Allowed to Stay Open till Midnight 1.30 am | Saam TV Marathi News Saam tv
मुंबई/पुणे

Pune Pubs News: पुणेकरांसाठी मोठी बातमी! सर्व पब्स आणि रेस्टॉरंट रात्री १.३० वाजता बंद होणार

Closing Time of Pubs, Bars and Restaurants in Pune: पुणे शहरात आता सर्व पब्स आणि रेस्टॉरंट रात्री 1.30 वाजताच बंद होणार आहेत. पब्स आणि रेस्टॉरंटमधीस ग्राहकांना १५-२० मिनिटे बफर टाइम देऊन सर्व अस्थापना बंद करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत.

Vishal Gangurde

अक्षय बडवे, मुंबई

Closing Time of Pubs and Restaurants:

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. पुणे शहरात आता सर्व पब्स आणि रेस्टॉरंट रात्री 1.30 वाजताच बंद होणार आहेत. पब्स आणि रेस्टॉरंटमधीस ग्राहकांना १५-२० मिनिटे बफर टाइम देऊन सर्व अस्थापना बंद करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. (Latest Marathi News)

शहरात आता सर्व पब्स आणि रेस्टॉरंट रात्री बंद करण्याच्या वेळेबाबत पोलीस आयुक्तांनी महत्वाची आदेश दिले आहेत. पोलीस आयुक्तालयात आज हॉटेल आणि पब चालकांची महत्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत काही प्रस्ताव घेऊन आलेल्या पब मालक आणि चालकांना आयुक्तांनी पुन्हा एकदा स्पष्ट शब्दात सूचना दिल्या.

पुण्यातील अनेक नामांकित पब आणि रेस्टॉरंटचे मालक यांनी आज पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली. आता पबमध्ये हुक्काचे सेवन आणि विक्री करण्यास सक्त मनाई असणार आहे. तर रात्री १.३० पर्यंत पबमधील 'डिस्को थेक' सुरू राहणार आहे. तसेच परदेशातील कोणी कलाकार सादरीकरणासाठी येणार असतील तर त्यांच्या संदर्भात माहिती पोलिसांना देणे अनिवार्य राहणार आहे.

पुण्यातील अनेक नामांकित पब आणि रेस्टॉरंटचे मालक यांनी आज पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली. आता पबमध्ये हुक्काचे सेवन आणि विक्री करण्यास सक्त मनाई असणार आहे. तर रात्री १.३० पर्यंत पबमधील 'डिस्को थेक' सुरू राहणार आहे. परदेशातील कोणी कलाकार सादरीकरणासाठी येणार असतील तर त्यांच्या संदर्भात माहिती पोलिसांना देणे अनिवार्य राहणार आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, पुणे पोलिसांकडून 'परमिट रुम'विषयी आदेश जारी करण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, या पार्श्वभूमीवर रात्री दीडपर्यंत पब्स आणि रेस्टॉरंट बंद करण्याचे आदेश दिले आहेत. बार, परमिट रुम आणि रेस्टॉरंट रात्री उशिरापर्यंत सुरु राहिल्यास आजूबाजूची शांतता भंग होण्याची शक्यता असते, या कारणात्सव सीआरपीसी कलमांतर्गत हा आदेश जारी करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

TCS Layoffs: TCSमध्ये 30 हजार नोकरकपात? आयटी कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचं सावट

Nilesh Ghaywal : खाकीचा खुळखुळा, गँगस्टर पळाला; निलेश घायवळला पळवणारे पुणे पोलिसांमध्ये कोण? VIDEO

Black Pepper : दररोज काळीमिरी खाल्ल्याने आरोग्याला होतात 'हे' भन्नाट फायदे

Anil Deshmukh : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील हल्ला खोटा? अहवालात नेमकं काय?

Face Care Tips: ग्लोइंग त्वचेसाठी बेसन आणि हळदीचा पॅक लावताय? थांबा, होतील 'हे' दुष्परिणाम

SCROLL FOR NEXT