Breaking : पुण्यातील बोगस भरती प्रकरण उघडकीस, 20 ग्रामपंचायतींमध्ये बोगस नोकर भरती SaamTV
मुंबई/पुणे

Breaking : पुण्यातील बोगस भरती प्रकरण उघडकीस, 20 ग्रामपंचायतींमध्ये बोगस नोकर भरती

या प्रकरणात 22 अधिकार्‍यांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी 16 जणांना निलंबित करण्यात आले असून, संबंधित ग्रामपंचायतींतील 212 माजी ग्रामपंचायत सदस्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

अमोल कविटकर साम टीव्ही पुणे

पुणे : पुणे महापालिकेत (PMC) समाविष्ट झालेल्या 20 ग्रामपंचायतींमध्ये बोगस नोकर भरती झाल्याचे स्पष्ट झाले असून या प्रकरणात 22 अधिकार्‍यांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी 16 जणांना निलंबित करण्यात आले असून, संबंधित ग्रामपंचायतींतील 212 माजी ग्रामपंचायत सदस्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. (Pune recruitment case exposed)

हे देखील पहा -

पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation) समाविष्ट होण्यापूर्वी 20 ग्रामपंचायतींमध्ये चुकीच्या पद्धतीने कर्मचारी नियुक्त करण्यात आल्याच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी तत्कालीन महिला व बालविकास अधिकारी (Women and Child Development Officer) दत्तात्रय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसमोर सादर केला आहे. काही प्रशासकांनी ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत असताना नियमबाह्य नोकर भरती केल्याचा आरोप निश्‍चित करण्यात आला आहे.

त्यानुसार 14 ग्रामसेवक आणि दोन कृषी विस्तार अधिकाऱ्यांना निलंबित (Suspended) करण्यात आले आहे. या 20 ग्रामपंचायती पुणे महापालिकेत जाण्यापूर्वी 658 जणांची भरती करण्यात आल्याची माहिती चौकशीतून समोर आली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT