Pune Rape Case: 25 वर्षीय तरुणीवर सामुहिक बलात्कार; चौघांना अटक  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Rape Case: 25 वर्षीय तरुणीवर सामुहिक बलात्कार; चौघांना अटक

25 वर्षीय तरुणीवर सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुण्याच्या दत्तवाडी परिसरात जनता वसाहतीत घडली आहे.

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

सागर आव्हाड

पुणे : 25 वर्षीय तरुणीवर सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुण्याच्या दत्तवाडी परिसरात जनता वसाहतीत घडली आहे. या प्रकरणात चौघांना दत्तवाडी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. सामुहिक बलात्काराच्या Rape घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

हे देखील पहा-

श्रीकांत सरोदे (वय 36), आदित्य ऊर्फ सन्या पवार (वय 19), सुर्वेश जाधव (वय 36) आणि आशिष मोहिते (वय 18, सर्व रा. जनता वसाहत) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत दत्तवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर krushna indalkar यांनी माहिती दिली आहे.

भारती विद्यापीठ परिसरात राहणारी एक 25 वर्षाची तरुणी स्वारगेटवरुन शुक्रवारी सायंकाळी घरी जात होती. यावेळी आरोपींपैकी एकाने तिला जनता वसाहतीत आणले व राहत्या घरात केला गॅंग रेप केला. त्यानंतर आरोपीने इतरांनाही तेथे बोलावून घेतले आणि तिच्यावर एका मागोमाग एक बलात्कार केला.

या दरम्यान, हा सर्व प्रकार सुरु असताना या तरुणीच्या रडण्याचा आवाज येत असल्याने तेथे परिसरात राहणार्‍यांना इतर लोकांना संशय आला. शेजाऱ्यांनी घराला बाहेरुन कडी लावली. आणि त्यांनी पोलिसांना कळविले. माहिती मिळताच दत्तवाडी पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी त्या तरुणीची सुटका केली आणि आरोपींना अटक केली आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूरमध्ये ट्रॅक्टर पुलावरून नदीत कोसळला, एकाचा जागीच मृत्यू

Online Rent Agreement : घरमालक आणि भाडेकरूंनी ऑनलाइन भाडेकरार कसा करावा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Farmer Loan Waiver Scheme: मयत शेतकऱ्यांच्या वारसांनाही कर्जमुक्तीचा लाभ मिळणार, सरकारचा मोठा निर्णय

पांढरे कपडे पुन्हा नव्यासारखे चमकवा! पिवळे डाग घालवण्यासाठी ‘या’ ५ स्मार्ट ट्रिक्स वापरा

Wardha: ग्रामसभेत दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी, गावकऱ्यांनी एकमेकांना धूधू धुतलं; व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT