Rajgurunagar girl body found in Bhima river  Saam Tv News
मुंबई/पुणे

Pune News : कॉलेजच्या क्लासला चालले सांगत घरातून निघाली; पुन्हा परतलीच नाही, भीमा नदीत तरुणीचा मृतदेह, अन् बॅग...

Rajgurugar Bhima River Body of a Young Woman Found : पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवल्यानंतर तरुणीचा मृतदेह भीमा नदीच्या पात्रात आढळला. पीडित तरुणीचा खून झाल्याचं पोलिसांनी प्राथमिक अंदाच वर्तवला आहे.

रोहिदास गाडगे

पुणे : पुण्यातील राजगुरुनगर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राजगुरुनगर येथील एका महाविद्यालयीन तरुणीचा मृतदेह भीमा नदीच्या पात्रात आढळला असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पिडित युवतीचा मृतदेह मांजरेवाडी येथे भिमा नदीच्या पात्रात आढळला असून सोबत असलेली बॅग बाजूच्या विहिरीत आढळून आली आहे.

'कॉलेजच्या क्लासला चालले' असं सांगून ती घरातून निघालेली होती, परंतु तरुणी परतली नाही. नातेवाइकांनी राजगुरुनगर पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवल्यानंतर तरुणीचा मृतदेह भीमा नदीच्या पात्रात आढळला. पीडित तरुणीचा खून झाल्याचं पोलिसांनी प्राथमिक अंदाच वर्तवला आहे.

सिंहगडावर टवाळखोरांनी विदेशी पर्यटकाला शिकवल्या शिव्या

छत्रपती शिवाजी महाराज यांचे शौर्य आणि पराक्रम सातासमुद्रापार पोहोचलेला आहे. त्यामुळे महाराजांच्या मावळ्यांनी लढा देऊन जिंकलेले किल्ले पाहण्यासाठी परदेशातून नागरिक येत असतात. परंतु मराठी भाषा किंवा भारतातली इतर भाषा येत नसलेल्या पर्यटकांना आपल्या महाराष्ट्रातील काही तरुण शिवीगाळ करयाला सांगत असल्याचा एक व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे महाराष्ट्राच्या अस्मितेवर कलंक लावण्याचं काम काही माथेफिरू तरुण करत आहेत.

असाच काहीसा प्रकार कॅनडातून आलेल्या पर्यटकासोबत घडला आहे. कॅनडा देशातून आलेल्या पर्यटक सिंहगड किल्ला सर करत असताना त्याला काही महाराष्ट्रातील तरुण भेटले. याप्रसंगी आपण कुठून आले आहेत? कसे आले आहेत? हा मूळ परिचय सोडून त्या तरुणांनी त्यांच्या मित्राला अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यास सांगितलं. त्यांच्या सांगण्यावरून त्यांनी शिवीगाळही केलं. मात्र, शिवीगाळ करत असताना आपण काहीतरी चुकीचं बोलत आहे, असं त्या पर्यटकाला वाटलं. कारण पर्यटक बोलल्यानंतर तरुण हसू लागले.

अतिथी देव भव! आपली ही महाराष्ट्राची संस्कृती सांगते. पण आपल्या तरुणांनी त्यांना महाराजांचा अनुभव सांगण्याऐवजी शिवीगाळ करण्यास भाग पाडलं. अशी खंत त्या पर्यटकाच्या मनात उद्भवली. त्यामुळे 'आम्ही येथे पुन्हा येणार नाही', असा त्या पर्यटकाने त्याच्या व्हिडिओमध्ये उल्लेख केला आहे. महाराजांचे किल्ले सर करण्यासाठी इतर देशातून येणाऱ्या पर्यटकांना हीन दर्जाची वागणूक काही तरुण देत असल्याचं पाहायला मिळत आहे. यामुळे महाराष्ट्राची अस्मिता, संस्कृती याला डाग लागला असल्याचं बोललं जात आहे. या व्हिडिओवर सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत आहे. हा व्हिडिओ खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या कार्यकर्त्यांनी एक्सवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओनंतर त्यांच्यावर कारवाई होईल का? हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajya Sabha Election: मोठी बातमी! राज्यसभेसाठी भाजपकडून ८ उमेदवारांच्या नावाची घोषणा, कुणाला दिली संधी?

Maharashtra News Live Update: धान उत्पादक आक्रमक! भंडाराच्या साकोलीत शेतकऱ्यांचा धडक ट्रॅक्टर मोर्चा..

अभिजीत दीपके अन् आशुतोष रांका यांना अटक होणार; ट्विटने खळबळ

Chanakya Niti: लग्नाआधी जोडीदार निवडताना या 7 गोष्टी नक्की तपासा; नाहीतर नंतर पश्चात्ताप होऊ शकतो

Kitchen Safety Tips: गॅस- स्टोव्हच्या जवळ 6 वस्तू ठेवणे टाळा, वास्तुशास्तानुसार ठरू शकते घातक

SCROLL FOR NEXT