Pune School Holiday Saam Tv
मुंबई/पुणे

Pune School Holiday: पुण्यातील घाटमाथ्याच्या शाळांना आज सुट्टी, परिसराला रेड अलर्ट; वाचा सविस्तर

Pune School Holiday Due To Rain: आज पुण्यातील घाटमाथा परिसरात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शाळांना सुट्ट्या दिल्या आहेत.

Siddhi Hande

आज राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. पुणे घाट आणि नाशिक घाट परिसरात आज रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शाळा कॉलेजला सुट्टी देण्यात आली आहे. याचसोबत पुण्यातून येणाऱ्या सर्व एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. (Pune Red Alert)

पुण्यातील या ठिकाणी शाळांना सुट्टी (Pune School Closed)

पुणे जिल्ह्यात पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यालगत असणाऱ्या सात तालुक्यातील शाळां बंद ठेवण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिलेत. मध्यरात्रीपासून पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून एक दिवस शाळां बंद ठेवण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यातील वेल्हा, भोर, मावळ, मुळशी, खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील शाळा बंद राहणार आहे.यासंबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत.

पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस

सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे भीमा-भामा खोऱ्यातील तीन धरणे आणि कुकडी प्रकल्पातील सातही धरणे ओव्हरफ्लो होऊन पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

उत्तर पुणे जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून, आवश्यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.पावसाचा जोर असाच वाढत राहिला, तर भीमा, भामा, घोड आणि मीना नदीपात्रातील पाणीपातळी अधिक वाढण्याची शक्यता आहे.

पुण्याला पाणीपुरवठा करणारे ४ ही धरणे जवळपास १०० टक्के भरले. गेल्या ३ दिवसापासून धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. खडकवासला धरणातून मुठा नदीत ३५ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

खडकवासला, पानशेत, वरसगाव टेमघर मिळून ९८ टक्के पाणीसाठा

खडकवासला: ९६.१७ टक्के

पानशेत: ९७.९३ टक्के

वरसगाव: ९८.६० टक्के

टेमघर: १०० टक्के

एकूण पाणीसाठा: ९८.३७ टक्के

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT