Pune weather forecast for next three days Saam TV AI Image
मुंबई/पुणे

Pune Rain Alert : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! ३ दिवस पावसाचा रेड अलर्ट, गरज असेल तरच घराबाहेर पडा

IMD red alert for Pune heavy rainfall : पुणे आणि घाट भागासाठी आयएमडीने पुढील तीन दिवसांचा रेड अलर्ट जारी केला आहे. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय.

Namdeo Kumbhar

IMD Maharashtra pune Weather Update : पुणे आणि आसपासच्या परिसरासाठी हवामान खात्याने (IMD) पुढील तीन दिवसांसाठी रेड अलर्टचा इशारा दिला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून शहरात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे, पण आता हा जोर आणखी वाढणार आहे. पुढील दोन ते तीन दिवस शहरात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. घाट विभागात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज असल्याने घाट विभागाला पुढील तीन दिवसांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.

पुढील दोन ते तीन दिवस पुणे शहरात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः पुणे जिल्ह्याच्या घाट भागात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो. याच पार्श्वभूमीवर घाट विभागासाठी पुढील तीन दिवसांचा 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे. त्यामुळे घाटातून प्रवास करणाऱ्यांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. दिवसाच्या सुरुवातीला आकाश मुख्यतः निरभ्र म्हणजेच स्वच्छ राहील. मात्र, दुपारनंतर आणि संध्याकाळच्या वेळी ढग जमा होऊन शहरात मुसळधार पावसाच्या सरी कोसळतील. शहराच्या तुलनेत घाटमाथ्यावर पावसाचा जोर खूप जास्त असेल.

गुरूवारी झालेली पावसाची नोंद

परिसर - पडलेला पाऊस (मिलिमीटर)

शिवाजीनगर - ६.४

पाषाण - ८

लोहगाव - ४.६

चिंचवड - ९.५

लवळे - ०.५

एनडीए - २

रत्नागिरीकडे समुद्र खवळलेला, साडेचार मीटरच्या लाटा

रत्नागिरी आणि संपूर्ण कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर कायम असून आज देखील 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात रात्रीपासूनच पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. येत्या ६ जुलैपर्यंत जिल्ह्यात असाच मुसळधार पाऊस सुरू राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

पावसासोबतच अरबी समुद्रात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. आज दुपारनंतर समुद्राला मोठे उधाण येणार असून, समुद्रात तब्बल साडेचार मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. समुद्र अत्यंत खवळलेला असल्याने किनारपट्टीवरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, सुरक्षिततेचा उपाय म्हणून किनारपट्टीवर ३ क्रमांकाचा इशारा (बावटा) लावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : समाज कल्याण विभागाच्या अर्थसहाय्य शिष्यवृत्ती मागण्यांसाठी पुण्यात विद्यार्थ्यांचे अन्नत्याग आंदोलन

Minister List: रायगडात गोगावले करणार ध्वजारोहण; नाशिकमध्ये कोण?; स्वातंत्र्यदिनी तुमच्या जिल्ह्यात कोणाच्या हस्ते होणार ध्वजारोहण, वाचा संपूर्ण यादी

रिक्षाजवळ दुचाकी आणली, महिलेच्या हातावर मारून पर्स हिसकावली नंतर... मुंबई पोलिसांनी उलगडलं रहस्य

Government Scheme : विद्यार्थांना दरमहा ₹१,००० मिळणार; योजनेचा लाभ कुणाला मिळणार? जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

Pune Tourism : पुण्याजवळील विरंगुळ्याचे ठिकाण, पावसाळ्यात तलावाकाठी घालवा निवांत संध्याकाळ

SCROLL FOR NEXT