Pune Railway News  AI Image
मुंबई/पुणे

Railway News : प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' मार्गावरील अनेक ट्रेन रद्द; काहींचे मार्ग बदलले, वाचा वेळापत्रक

Pune Railway News : पुणे विभागातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! हडपसर–घोरपडी तिसऱ्या रेल्वेमार्गाच्या कामामुळे ३ आणि ४ ऑक्टोबरला अनेक गाड्या रद्द.

Alisha Khedekar

  • ३ आणि ४ ऑक्टोबरला पुणे विभागातील अनेक रेल्वे सेवांमध्ये बदल

  • हडपसर–घोरपडी तिसऱ्या रेल्वेमार्गाच्या कामामुळे काही गाड्या रद्द

  • काही गाड्या पुणे स्थानकाऐवजी खडकी, दौंड, सोलापूर, सातारा किंवा जेजुरीपर्यंतच धावणार

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! हडपसर–घोरपडी तिसऱ्या रेल्वेमार्गाच्या कामासाठी पुणे आणि हडपसर यार्डमध्ये सुरू असलेल्या कामाचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर होणार आहे. शनिवार आणि रविवार, म्हणजेच ३ आणि ४ ऑक्टोबर रोजी पुणे विभागातून धावणाऱ्या अनेक रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. या दोन दिवसांत काही लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले असून, अनेक गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलेल्या बदलांनुसार, काही गाड्या पुणे स्थानकाऐवजी खडकी, दौंड, कुर्डुवाडी, सोलापूर, सातारा किंवा जेजुरीपर्यंतच धावणार आहेत. त्यामुळे नियमितपणे पुणे स्थानकावर ये-जा करणाऱ्या प्रवाशांना पर्यायी प्रवासाची व्यवस्था करावी लागू शकते. पुणे–नागपूर, पुणे–सोलापूर, नागपूर–पुणे, पुणे–बीड आणि अमरावती–पुणे या मार्गांवरील काही गाड्यांच्या फेऱ्यांवर परिणाम झाला आहे. याशिवाय पुणे–दौंड आणि पुणे–बारामती मार्गावरील डेमूच्या काही फेऱ्याही रद्द करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, ४ ऑक्टोबर रोजी पुणे–मुंबई एक्स्प्रेससह पुणे–सोलापूर, पुणे–कोल्हापूर, पुणे–शिर्डी, पुणे–नागपूर आणि पुणे–अमरावती या गाड्यांच्या सेवांवरही परिणाम होणार आहे. पुणे–लोणावळा उपनगरीय मार्गावरील काही फेऱ्यादेखील रद्द करण्यात आल्या आहेत.

तिसऱ्या रेल्वेमार्गाच्या कामामुळे रेल्वे वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी हे बदल करण्यात आले आहेत. मात्र, अचानक झालेल्या बदलांमुळे प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांनी तिकीट, गाडीचा मार्ग आणि अंतिम स्थानकाची माहिती तपासूनच प्रवासाचे नियोजन करावे, करण्याचे आवाहन रेल्वेने केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : शिक्षक पदवीधर निवडणुकीचे उमेदवारीवरून महाविकास आघाडीत नाराजी

India vs Pakistan: भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने; एशियन गेम्सच्या फायनलमध्ये रंगणार महामुकाबला, जाणून घ्या कुठे पाहता येणार सामना?

Bank FD : बँकेत 10 लाखांची FD आहे? बँक बुडाली तर हातात किती पैसे येणार? जाणून घ्या नियम

Morning Walk Benefits: मॉर्निंग वॉक न चुकता करताय? हे 6 सॉलिड फायदे माहिती असायलाच हवेत

Ambulence App : महाराष्ट्रात आता कॅबसारखी बुक करता येणार रुग्णवाहिका, सरकार लवकरच लाँच करणार अॅप

SCROLL FOR NEXT