PURANDAR AIRPORT FAKE ORDER VIRAL | PUNE ADMINISTRATION CLARIFIES TRUTH Saam Tv
मुंबई/पुणे

Pune : पुरंदर विमानतळ प्रकल्पाबाबत बनावट मेसेज व्हायरल, प्रशासनाने केला खुलासा; गुन्हा दाखल

Pune Purandar Airport : पुरंदर विमानतळ प्रकल्पाबाबत सोशल मीडियावर बनावट आदेश व्हायरल झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. प्रशासनाने ही माहिती खोटी असल्याचे स्पष्ट करत नागरिकांना अफवांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

  • पुरंदर विमानतळ प्रकल्पाबाबत बनावट आदेश सोशल मीडियावर व्हायरल

  • प्रशासनाने पत्र पूर्णपणे खोटे असल्याचे स्पष्ट केले

  • अज्ञात आरोपीविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल

  • शेतकऱ्यांना अफवांपासून सावध राहण्याचे आवाहन

  • बनावट सरकारी लेटरपॅड आणि स्वाक्षऱ्यांचा गैरवापर

पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी सोशल मीडियावर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विमानतळ प्रकल्पाची जागा तांत्रिकदृष्ट्या अयोग्य ठरली असून भूसंपादन प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे, असा दर्शवणारा उपजिल्हाधिकारी, भूसंपादन क्र. १,पुणे यांच्या कार्यालयाचा बनावट आदेश सोशल मीडियावर व्हॉट्सॲप ग्रुप्सवर) मोठ्या प्रमाणावर व्हायरल केला जात आहे.हा आदेश पूर्णपणे खोटा आणि बनावट असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

या बनावट पत्रक आणि खोट्या मजकुराप्रकरणी भूमी संपादन विभागाचे अधिकारी संतोष हरी बरगे (वय ३७) यांनी सासवड पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३३६(२) आणि ३३६(४)(खोटी माहिती व बनावट दस्तऐवज तयार करून जनतेची दिशाभूल व संभ्रम निर्माण करणे अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

व्हायरल झालेल्या खोट्या पत्रात काय लिहिले आहे?

1. पुरंदर विमानतळासाठी प्रस्तावित जागा तांत्रिक तपासणीनंतर अयोग्य आढळली आहे.

2. भौगोलिक व हवामानविषयक अडचणी आणि धावपट्टीच्या मर्यादांमुळे जागा बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

3. भूसंपादन प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात येत असून नवीन जागा निश्चित होईपर्यंत शेतकऱ्यांनी कोणतीही संमतीपत्रे किंवा हमीपत्रे देऊ नयेत.

प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या आणि हुबेहूब सरकारी लेटरपॅडचा गैरवापर करून हे पत्र स्थानिक शेतकऱ्यांमध्ये भीती व संभ्रम पसरवण्यासाठी हेतुपुरस्सर तयार करण्यात आले आहे. पुणे जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी पुरंदर तालुक्यातील विशेषतः उदाचीवाडी, खानवडी, कुंभारवळण, पारगाव, एकतपूर आणि मुंजवडी या बाधित गावांतील शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, अशा कोणत्याही खोट्या व दिशाभूल करणाऱ्या पत्रांवर किंवा सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नका.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादीवर पक़ड घट्ट, अनावश्यक हस्तक्षेप केल्यास विचार करणार, वर्धापन दिनाला पक्षातील नेत्यांना इशारा

अखंडित काँग्रेस उभी राहणार? ज्येष्ठ नेत्याला साद, भाजपचं टेंशन वाढणार?

आता म्हातारपण येणार नाही? माणूस देणार मृत्यूला हुलकावणी?

डोंबिवलीतील वाहतूक कोंडीची समस्या सोडवा; भाजपची गेमचेंजर मागणी, महापालिका काय निर्णय घेणार?

म्हाडा भूखंड घोटाळा प्रकरणावरून राजकारण फिरलं? दिग्गज नेत्याची विधानपरिषद निवडणुकीतून अचानक माघार, बंद दाराआड काय ठरलं?

SCROLL FOR NEXT