पुणे : पुणे हिट अँड रन प्रकरणातील आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने दोघांना उडवल्यानंतर संतप्त नागरिकांकडून कारची तोडफोड केली होती. संतप्त नागरिकांनी कारच्या काचांवर दगड आपटून तोडफोड केली. या तोडफोडीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. तसेच पुण्यातील दुचाकीवरील दोघांना उडवणाऱ्या अल्पवयीन मुलाच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचीही मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
पुण्यात बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने दारुच्या नशेत असताना कारने दोघांना उडवलं. भरधाव वेगात असलेल्या कारने उडवल्यानंतर तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता. दोघांना उडवल्यानंतर या अल्पवयीन कारचालकाने कार पुढे नेली. त्यानंतर नागरिकांनी या आरोपी मुलाला अडवलं. या भीषण अपघातानंतर नागरिकांनी पोर्शे कारची तोडफोड केली.
घटनास्थळी असलेल्या संतप्त नागरिकांकडून कारची तोडफोड करण्यात आली. कारच्या तोडफोडीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तसेच सोशल मीडियावर दोघांचा जीव घेणाऱ्या अल्पवयीन मुलाला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली जात आहे.
रस्त्यावर आरोपीची पोर्श कार दिसत आहे. अपघातानंतर रस्त्याच्या कडेल्या असलेल्या कारची नागरिक तोडफोड करताना दिसत आहे. या कारमध्ये कोणीही बसलेलं दिसत नाही. संतप्त नागरिक दगडाने कारची तोडफोड करताना दिसत आहेत. अपघातानंतर आक्रमक झालेल्या तरुणांनी कारची काच दगडाने फोडली आहे.
पुणे हिट अँड रन प्रकरणानंतर नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणावरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे आयुक्तांना फोन करून कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांच्या पाठोपाठ मुख्यमंत्री शिंदे यांनी पुणे पोलिसांना फोन करून कारवाईचे आदेश दिले आहेत.
याप्रकरणात कुणालाही पाठीशी न घालता, राजकीय दबावाला बळी न पडता कायद्याने कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आदेशापाठोपाठ आता मुख्यमंत्र्यांनीही कडक भूमिका घेतल्याचे दिसत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.