Pune Sassoon Hospital Dr Ajay Taware Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Hit and Run Case : पुणे ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरण; डॉक्टरांना रक्ताचे नमुने बदलण्यासाठी आर्थिक रसद कोणी पुरवली? पोलिसांकडून शोध सुरु

Pune Hit and Run News : पुणे हिट अँड रन प्रकरणात नवनव्या बाबी समोर येत आहेत. या प्रकरणात आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलण्यासाठी डॉक्टरांना आर्थिक रसद पुरवल्याची माहिती समोर येत आहे. ही आर्थिक रसद कोणी पुरवली, याबाबत पोलिसांनी शोध सुरु केला आहे.

Vishal Gangurde

अक्षय बडवे, साम टीव्ही प्रतिनिधी

पुणे : पुणे हिट अँड रन प्रकरणात नवनवीन माहिती समोर येत आहे. या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे रक्ताचे नमुने बदलल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांकडून आता ससून रुग्णालयातील डॉक्टरांना आर्थिक रसद पूरवणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरु आहे. आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलण्यासाठी डॉ. अजय तावरेला आलो रुपये दिल्याची प्राथमिक माहिती आहे.

पुणे ससून रुग्णालयातील ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणातील आरोपीचे रक्ताचे नमुने ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी बदलल्याची माहिती समोर येत आहे. अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलण्यासाठी बदलण्यासाठी लाखो रुपये दिल्याची माहिती समोर आली आहे. अजय तावरेला दिलेल्या मोठ्या आर्थिक रकमेची पोलिसांकडून शोध सुरु आहे. आतापर्यंत ३ लाख रुपये पुणे पोलिसांनी जप्त केले आहेत.

पुणे पोर्शे अपघातातील अल्पवयीन आरोपींनी लावली होती रेस

कल्याणीनगर हिट ऍण्ड रन प्रकरणात रोज नवनव्या गोष्टी समोर येत आहे. पबमध्ये पार्टी केल्यानंतर अल्पवयीन आरोपी आणि त्याचे मित्र दोन गाड्यांमधून निघाले होते. त्यांनी रेस लावली होती आणि त्यामुळे दुर्घटना घडली. पोर्शे कार दुर्घटनाग्रस्त झाली. पण दुसरी कार पळून गेली. त्या कारमध्ये कोण होते, याचा शोध आता सुरू झाला आहे.

पबमध्ये पार्टी केल्यानंतर अल्पवयीन आरोपी आणि त्याचे दोन मित्र पोर्शे कारमध्ये होते.दुसऱ्या गाडीमध्ये इतर मित्र होते. आरोपी मद्यधुंद झाल्याने त्यांना पूर्ण शुद्धही नव्हती. त्या धुंदीत त्यांनी कारची रेस लावली. वेदांतने इतक्या वेगाने कार चालवली की, त्या वेगामुळे निर्माण झालेल्या आवाजाने रस्त्याच्या दुतर्फा जाणाऱ्या लोकांचे लक्ष वेधले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pravin Tarde : प्रवीण तरडेंनी 'देऊळ बंद २'चं शूटिंग थांबवले अन् रिलीज डेटही पुढे ढकलली, कारण काय?

Divorce: घटस्फोटानंतर दुग्धाभिषेक, केक कापला; जंगी सेलिब्रेशन करणारा तरुण आहे तरी कोण?

Agriculture Crisis: राजकारणानं घेतला शेतकऱ्याचा बळी? तहसील कार्यालयात शेतकऱ्याची आत्महत्या

IPS अधिकाऱ्यानं घरातच आयुष्य संपवलं, IAS पत्नीकडून गंभीर आरोप, संशयाची सुई नेमकी कुणाकडे?

Maharashtra Live News Update: आईने प्रियकराच्या मदतीने केली पोटच्या मुलाची हत्या

SCROLL FOR NEXT