Sassoon Hospital  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Porsche Car Accident: ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार प्रकरण, ससूनमधील महत्वाची कागदपत्र पोलिसांकडून जप्त

Pune Hit And Run Case: पुणे अपघात प्रकरणातील आरोपीच्या ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार प्रकरणात पुणे पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. आज पुणे पोलिसआरोपींना घेऊन ससून रुग्णालयात आले होते.

Priya More

पुणे अपघात प्रकरणातील (Pune Porsche Car Accident) आरोपी मुलाच्या ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार केल्याप्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पुणे पोलिसांच्या (Pune Police) गन्हे शाखेने बुधवारी मोठी कारवाई केली आहे. ससून रुग्णालयातील (Sassoon Hospital) रजिस्टर आणि आवश्यक कागदपत्र पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणात ससून रुग्णालयातील दोन डॉक्टर आणि एका शिपायाविरोधात गुन्हे दाखल असून आज त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

पुणे हिट अँड रन प्रकरणातील आरोपीच्या ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार केल्याप्रकरणात आतापर्यंत एकूण तीन गुन्हे दाखल झालेले आहेत. या गुन्ह्यांमधील इंटरलिंक्स आणि समान दुवे शोधले जात आहेत. या तपासात गुन्ह्यासंबंधी कागदपत्र जुळवळे, त्याचे व्यवस्थित अभिलेख तयार करण्याचे काम सुरू आहे. लवकरात लवकर न्यायालयात आरोपपत्र दाखल होण्याकरिता आवश्यक असलेल्या कागदपत्रांची जुळवा जुळवा सुरू आहे.

याप्रकरणात पुणे पोलिसांनी सोमवारी डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर यांना अटक केली. त्यानंतर याप्रकरणात पैशांची देवाण-घेवाण करण्यासाठी मदत करणाऱ्या शिपायी अतुल घटकांबळे याला देखील अटक केली. याप्रकरणात तिघांची देखील चौकशी सुरू असून नवनवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. अजय तावरे यांनी मी या प्रकरणात अनेकांची नावं घेणार असल्याचा इशारा दिला होता. याप्रकरणाचा तपास करताना पुणे पोलिसांनी आज डॉ. श्रीहरी हळनोर यांना ससून रुग्णालयात आणले होते. कुठल्या ठिकाणी काय कार्य केले, भेट कुठे झाली? याबाबत पोलिसांनी श्रीहरी हळनोर यांना ससूनमध्ये आणून चौकशी केली.

तसंच, ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार प्रकरणात अटक असलेल्या ससून रुग्णालयातील शिपायी अतुल घटकांबळे याला देखील पुणे पोलिसांनी ससून रुग्णालयामध्ये आणले होते. त्याच्याकडून सर्व प्रकारची माहिती घेतली गेली. ⁠ब्लड सॅम्पल्स बदलल्यानंतर ते कुठे फेकलेस? ही सर्व माहिती पोलिसांकडून गोळा करण्यात आलेली आहे. त्यानंतर अतुल घटकांबळेला पोलिसांनी पुन्हा पोलिस आयुक्तालयामध्ये नेले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raja Raghuji Bhosle Sword: वाघ नखानंतर राजांची तलवार महाराष्ट्रात येणार; लंडनमधील तलवार हस्तांतरित

Maharashtra Politics: आंबेडकर-ठाकरे एकत्र येणार? वंचितची मोठी घोषणा, पालिका निवडणुकीत नवी समीकरणं

India Population: भारताच्या लोकसंख्या वाढीला ब्रेक; मूल नको असलेल्या कुटुंबांची संख्या वाढली

Mumbai Local Accident : मुंबई लोकलच्या टपावर चढला; तरुणासोबत क्षणात होत्याचं नव्हत झालं

Superfood For Monsoon: पावसाळ्यात निरोगी आरोग्यासाठी वरदान आहेत 'हे' सूपरफूड, आजच आहारात करा समावेश

SCROLL FOR NEXT