devendra fadnavis  saam tv
मुंबई/पुणे

Kasba Byelection 2023: 'आम्ही पुन्हा येऊ'; कसबा पोटनिवडणुकीतील पराभवानंतर देवेंद्र फडणवीसांचं ट्वीट चर्चेत

कसबा पोटनिवडणुकीत भाजपच्या 28 वर्षांच्या अजिंक्य गडाला महाविकास आघाडीने सुरुंग लावला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Pune Byelection : पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा निकाल आज समोर आला आहे. कसबा पोटनिवडणुकीत भाजपच्या 28 वर्षांच्या अजिंक्य गडाला महाविकास आघाडीने सुरुंग लावला आहे. भाजपच्या या पराभवावर उपमुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत जनतेचा जनादेश स्वीकारला आहे. 'आम्ही पुन्हा येऊ' असं फडणवीसांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांचं 'मी पुन्हा येईन' हे वाक्य खुप गाजलं होतं. कसब्यातील पराभवानंतर आता फडणवीसांनी आम्ही पुन्हा येऊ असं म्हटलं आहे. म्हणजे कसब्यातील पराभवानंतर भाजप येथे पुन्हा नव्या जोमाने तयारी करुन आगामी विधानसभा निवडणुकीत विजयासाठी प्रयत्न करणार आहे.

कसबा पोटनिवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत म्हटलं की, कसब्यातील जनतेचे मनापासून आभार. जनतेने आम्हाला आशीर्वाद दिलेत. थोडे कमी आशीर्वाद मिळाले असले तरी त्यांनी दिलेल्या जनादेशाचा स्वीकार करतो. पण, एक नक्की सांगतो, आपले आशीर्वाद मागण्यासाठी ‘आम्ही पुन्हा येऊ’!

चिंचवड पोटनिवडणुकीत अश्विनी जगताप यांच्या विजयाबाबत बोलताना त्यांनी म्हटलं की. चिंचवड विधानसभा क्षेत्रातून आमच्या उमेदवार अश्विनीताई जगताप या विजयी झाल्या. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि विकासाला साथ देणाऱ्या चिंचवडवासियांचे मनापासून आभार! स्व. लक्ष्मणभाऊ जगताप यांना ही भावपूर्ण आदरांजली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana KYC: उरला फक्त आठवडा! लाडक्या बहिणींनो आजच eKYC करा, अन्यथा ₹१५०० विसरा

Maharashtra Live News Update : महाराष्ट्र गारठला, मुंबई, पुण्यासह राज्याचा पारा घसरला

Maharashtra Weather Update : पुणे महाबळेश्वरपेक्षा थंड, धुळ्यात पारा ८.६ अंशावर; राज्यात थंडीची जोरदार एंट्री

Success Story: जिद्द! एकदा नव्हे तर ६ वेळा MPSC क्रॅक; नांदेडचा लेक झाला क्लास १ ऑफिसर; ओमकेश जाधव यांचा प्रवास

Lucky Zodiac Signs: 11 नोव्हेंबरपासून 'या' राशींचं नशीब चमकणार; शतांक योगाने नुसता पैसाच नाही तर करियरमध्येही मिळणार संधी

SCROLL FOR NEXT