Sharad Pawar vs Ajit Pawar News Saam TV
मुंबई/पुणे

Pune NCP Group News: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट, कोण कुणाच्या बाजूने? संपूर्ण यादीच आली समोर

Sharad Pawar vs Ajit Pawar News: पुण्यातही राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत.

Satish Daud

अक्षय बडवे, साम टीव्ही

Sharad Pawar vs Ajit Pawar News: अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी शिंदे-भाजप सरकारसोबत हातमिळवणी केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. राष्ट्रवादी पक्षात अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडले आहेत. राज्यभरातील अनेक कार्यकर्त्यांनी या दोन्ही गटाला पाठिंबा दर्शवला आहे. दरम्यान, पुण्यातही राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत.

बुधवारी मुंबईत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी आमदारांची बैठक बोलावली होती. तर दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी दोन्ही गटांकडून शक्तीप्रदर्शन करण्यात आलं.

पण, यात अजित पवार (Ajit Pawar) यांची सरशी झाल्याचं पाहायला मिळालं. कारण, अजित पवार गटाला बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा मिळाल्याचं समोर आलं आहे. राष्ट्रवादीच्या 40 हून जास्त आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे

पुणे शहरात कोण कोणाच्या बाजूने?

शरद पवार गट: खासदार वंदना चव्हाण, आमदार चेतन तुपे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते अंकुश काकडे,दीपाली धुमाळ,काका चव्हाण, सायली वांजळे, कमल ढोले पाटील, मृणालिनी वाणी, महेश हांडे, बाळासाहेब रायकर , शरद डबडे, कुणाल पोकळे, सुरेखा धनिष्ठे, गणेश नलावडे, किशोर कांबळे, विक्रम जाधव आदी

अजित पवार गट: आमदार सुनील टिंगरे, राजलक्ष्मी भोसले, दीपक मानकर, बाबूराव चांदेरे, सुभाष जगताप, युवराज बेलदरे, प्रकाश कदम, महेंद्र पठारे, प्रमोद निम्हण, आनंद आलकुंटे, दत्ता धनकवडे, बाळासाहेब बोडके, विनोद आरसे, अनिस सुंडके, प्रशांत म्हस्के, शंकर केमसे, रोहिणी चिमटे, सुनीता मोरे, सदानंद शेट्टी, विकास दांगट, बाबा धुमाळ, गणेश घुले, आदींचा पाठिंबा.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Central Railway: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मतदारांसाठी विशेष लोकल धावणार, वेळ काय? जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Election : महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर? भाजप उमदेवाराच्या प्रचाराला शिंदेसेनेचा नकार, गोरेगावमध्ये नेमकं काय सुरु?

Maharashtra Weather : थंडीची चाहुल लागताच 'या' जिल्ह्यांवर पावसाचं सावट, हवामानाचा आजचा अंदाज काय?

Sharad Pawar: 'गद्दार गणोजीला सुट्टी नाही'; मुंडे-भुजबळांनतर शरद पवार यांचा दिलीप वळसेंवर प्रहार

Today Horoscope: अचानक हाती पैसा मिळेल, पगारवाढ होण्याची शक्यता; वाचा तुमचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT