Pune Police Bribe News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune : पुण्यात बड्या अधिकाऱ्याने घेतली २लाखांची लाच; पोलीस दलात खळबळ

Pune Police Bribe News : पुण्यातील बंडगार्डन पोलीस स्टेशनमधील उपनिरीक्षकाने गुन्हा दाखल न करण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तक्रारीनंतर एसीबीने सापळा रचून संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Alisha Khedekar

  • पुण्यातील बंडगार्डन पोलीस स्टेशनमधील उपनिरीक्षकाने लाच मागितली

  • गुन्हा दाखल न करण्यासाठी दोन लाख रुपयांची मागणी

  • एसीबीने सापळा रचून प्रकरणाची पडताळणी केली

  • संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

सचिन जाधव, पुणे

Pune Police Sub-Inspector Sandeep Khedkar Caught Demanding 2 Lakh Bribe काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये जीएसटी अधिकाऱ्यांना लाखोंची लाच घेताना पकडण्यात आले. तसेच परभणीत एका पोलीस कर्मचाऱ्याला हजारोंची लाच घेताना रंगे हाथ पकडण्यात आलं. या सलग घडलेल्या घटनांनंतर पुन्हा एकदा राज्यातील पोलीस दलात खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. पुण्यातील बंडगार्डन पोलीस स्टेशन मधील एका पोलीस अधिकाऱ्याने २ लाखांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित अधिकाऱ्याला ताब्यात घेतले आहे.

एसीबी'ने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यक्तीच्या विरोधात एका व्यक्तीने बंडगार्डन पोलिस ठाण्यात फसवणुकीसंदर्भात अर्ज केला होता. या अर्जाची चौकशी पोलिस उपनिरीक्षक संदीप खेडकर (रा. वानवडी) करत होते.

मात्र तक्रारदाराविरुद्ध गुन्हा दाखल न करण्यासाठी खेडकर यांनी दोन लाख रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रारदाराने तीन फेब्रुवारी रोजी 'एसीबी'कडे तक्रार केली. तक्रारदाराच्या तक्ररीवरून लाचलुचपत विभागाने सापळा रचला.

पडताळणीदरम्यान खेडकर यांनी स्वतःसाठी आणि वरिष्ठांसाठी मिळून तडजोडीअंती एक लाख रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले असून आता याच प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस दलात सतत होणाऱ्या भ्रष्टाचारामुळे खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RCB vs GT IPL 2026 Final: विजयी षटकार मारत आरसीबीने दुसऱ्यांदा जिंकली आयपीएलची ट्रॉफी

Krunal Pandya: कृणाल पांड्याचा जादूवाला चेंडू पाहून बटलर चक्रावला; क्रिकेटचा देव मात्र भारावला! कृणालचं सचिन तेंडुलकरकडून कौतुक

RCB vs GT Final: आरसीबीने सलग दुसऱ्यांदा पटकावलं विजेतेपद; विजयासह रचला इतिहास

पैसे झाडालाच लागतात; व्हिडिओ पाहून तुम्हीही होय म्हणाल, नेमकं प्रकार काय? VIDEO

भाजपकडून विधानपरिषदेसाठी ११ उमेदवारांची नावे जाहीर; कोणाला कुठून मिळाली उमेदवारी?

SCROLL FOR NEXT