Pune News  Saam TV
मुंबई/पुणे

Pune Police News : महिला सुरक्षेसाठी पुणे पोलिसांचा मोठा निर्णय; पुणेकरांच्या विविध तक्रारींसाठी WhatsApp नंबर जारी

Pune News : तातडीच्या सेवेसाठी ११२ डायल करा, असं आवाहन पुणे शहर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

साम टिव्ही ब्युरो

Pune News : महिलांच्या सुरक्षेसाठी पुणे पोलीस खडाडून जागे झाले आहेत. एका बाजूला शहरात कोम्बिंग ऑपरेशन सुरू असून आता तक्रारींसाठी व्हॉट्सॲप सेवा सुरू करण्यात आली आहे.

आता पुणे शहरातील नागरिक थेट पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रार करू शकतात. पुणे शहर पोलिसांकडून आता तक्रार करण्यासाठी नवीन व्हॉट्सॲप क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. 8975953100 या नंबरवर कोणीही कधीही तक्रार करू शकतात.

नागरिक पोलीस आयुक्तांचा व्हॉट्सॲप नंबर सेव्ह करून तुमच्या परिसरातील महिलांच्या सुरक्षेबाबत सूचना आणि अभिप्राय देण्यासाठी मेसेज करू शकता. त्यासोबतच इतर घटनांचा आढावा घेऊन कारवाई करण्यात येणार आहे. तातडीच्या सेवेसाठी ११२ डायल करा, असं आवाहन पुणे शहर पोलिसांकडून करण्यात आले आहे. (Latest Marathi News)

पोलीस आयुक्तांच्या व्हॉट्सअॅपवर येणाऱ्या तक्रारी संबंधीत पोलिस ठाण्यांना आणि दामिनी युनिट्सना कळवल्या जातील. तसेच हे मेसेजेस आणि त्यावर केलेली कारवाई ही पोलीस आयुक्त पातळीवर मॉनिटक केली जाईल, असं पुणे पोलीस सहआयुक्त संदीप कर्णि यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नादाला लागू नका, मी ५ लोकांना ठार केले; संजय पाटलांची उघड धमकी? ठाकरेंच्या खासदाराच्या आरोपाने उडाली खळबळ

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

कांदापोहेऐवजी अवघ्या ५ मिनिटांत बनवा कुरकुरीत 'पोहा पकोडा', रेसिपी वाचून खायचं मन करेल

India forts : इतिहासातील खजिना! भारताच्या कानाकोपऱ्यात लपलेले ५ किल्ले, आयुष्यात एकदा नक्की पाहा

Belly fat reduction: 10 दिवसात घटवा 5 किलोपर्यंत वजन; डॉक्टरांनी सांगितला खास डाएट प्लान, बेली फॅटही होईल कमी

SCROLL FOR NEXT