Drug Rehabilitation  saam tv
मुंबई/पुणे

अमली पदार्थांच्या व्यसनाविरोधात पुणे पोलिसांचा अनोखा उपक्रम, तब्बल १२ जणांचे पुनर्वसन

Drug Rehabilitation : अमली पदार्थांच्या व्यसनाला आळा घालण्यासाठी पुणे शहर पोलिसांच्या परिमंडळ ३ ने महत्त्वपूर्ण उपक्रम राबवला.

Akshay Badve

अक्षय बडवे, साम प्रतिनिधी

अमली पदार्थांच्या व्यसनाला आळा घालण्यासाठी केवळ कायदेशीर कारवाई न करता व्यसनाधीन व्यक्तींना उपचार आणि पुनर्वसनाची संधी देण्याच्या उद्देशाने पुणे शहर पोलिसांच्या परिमंडळ ३ ने पुढाकार घेतला आहे. एनडीपीएस कायदा कलम ६४अ अंतर्गत १२ जणांना व्यसनमुक्ती उपचारांसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी नऊ जणांना न्यायालयाने दोषमुक्त केले असून, उर्वरित तीन जणांची प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत.

परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त डॉ. सागर कवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वारजे, नर्‍हे, उत्तमनगर आणि नांदेड सिटी पोलीस ठाण्यांनी हा उपक्रम राबविला. अमली पदार्थांची विक्री, पुरवठा आणि वितरण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासोबतच, कायद्यानुसार पात्र असलेल्या व्यसनाधीन व्यक्तींना उपचार आणि पुनर्वसनाची संधी उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा उद्देश होता.

एनडीपीएस कायद्याच्या कलम ६४अ नुसार, अमली पदार्थांचे सेवन किंवा अल्प प्रमाणातील अमली पदार्थ बाळगण्यासंदर्भातील विशिष्ट गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या पात्र व्यक्तींना कायद्यातील अटींची पूर्तता केल्यास खटल्यातून प्रतिरक्षण मिळू शकते. यासाठी संबंधित व्यक्तीने स्वेच्छेने शासनमान्य व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेणे आवश्यक आहे.

या उपक्रमांतर्गत सर्व १२ जणांना किरकटवाडी येथील आत्मनिर्भर सोशल फाउंडेशनच्या व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांनी एक महिन्याचा उपचार कार्यक्रम पूर्ण केला. उपचार पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने नऊ जणांना दोषमुक्त केले, तर उर्वरित तीन जणांच्या प्रकरणांवरील कार्यवाही अद्याप प्रलंबित आहे.

वारजे पोलिसांनी तीन जणांना उपचारांसाठी पाठविले होते. त्यापैकी एकाला न्यायालयाने दोषमुक्त केले असून, दोघांची प्रकरणे प्रलंबित आहेत. नर्‍हे पोलिसांनी पाठविलेल्या तीन जणांपैकी दोघांना दोषमुक्त करण्यात आले असून, एकाचे प्रकरण प्रलंबित आहे. उत्तमनगर आणि नांदेड सिटी पोलिसांनी प्रत्येकी तीन जणांना उपचारांसाठी पाठविले होते. या दोन्ही पोलीस ठाण्यांनी पाठविलेल्या सर्व सहा जणांना न्यायालयाने दोषमुक्त केले आहे.

अमली पदार्थांचे व्यसन ही केवळ कायदा आणि सुव्यवस्थेची समस्या नसून, ती गंभीर आरोग्यविषयक आणि सामाजिक समस्या आहे. या व्यसनाचा परिणाम संबंधित व्यक्तींसह त्यांच्या कुटुंबीयांवरही होतो. विशेषतः तरुणांमध्ये व्यसनाधीनतेचे वाढते प्रमाण लक्षात घेता, उपचार आणि समुपदेशनाच्या माध्यमातून त्यांना मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या उपक्रमातून अमली पदार्थांची तस्करी, विक्री आणि वितरण करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई सुरू ठेवतानाच, कायद्यानुसार पात्र असलेल्या व्यसनाधीन व्यक्तींना उपचार, समुपदेशन आणि पुनर्वसनाची संधी देण्यावर भर दिला जात आहे. व्यसनमुक्तीनंतर या व्यक्तींना पुन्हा समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न असल्याचं पोलिस उपआयुक्त सागर कवडे यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pradeep Purnekar Case : पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, नवीन व्हिडीओ आला समोर, मुलाचा खळबळजनक दावा

Maharashtra News Live Update: दिल्लीच्या हवेची गुणवत्ता खालावली

Rice Hacks : भात शिजवताना १ तमालपत्र नक्की घाला; मिळतील 'हे' ६ फायदे

जरांगे-पाटील संधी साधूपणा करताय; भरत गोगावलेंचा टोला,शिंदेंवरील 500 कोटींच्या आरोपांवरून राजकारण तापलं!

Khardi Kasara : लोकल प्रवाशांसाठी खूशखबर! कसारा-खर्डी मार्गावर सुरू झाली तिसरी मार्गिका; प्रवास होणार सुपरफास्ट

SCROLL FOR NEXT