Pune Baner Crime News  Saam TV
मुंबई/पुणे

Pune News: बाणेरमधील अलिशान हॉटेलवर मध्यरात्री पोलिसांचा छापा; ११ तरुणींची 'सिनेस्टाइल' सुटका, ५ जणांना अटक

Pune Crime News: पुण्यातील बाणेर परिसरात असलेल्या दोन वेगवेगळ्या हॉटेलमध्ये पोलिसांनी सोमवारी (१२ फेब्रुवारी) मध्यरात्रीच्या सुमारास अचानक छापा टाकला. यावेळी ११ तरुणींची सुटका करण्यात आली.

Satish Daud

Pune Baner Crime News

पुण्यातील बाणेर परिसरात असलेल्या दोन वेगवेगळ्या हॉटेलमध्ये पोलिसांनी सोमवारी (१२ फेब्रुवारी) मध्यरात्रीच्या सुमारास अचानक छापा टाकला. यावेळी काही एजंट हॉटेलमध्ये हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालवत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत ५ जणांना अटक केली. तसेच ११ मुलींची सुटका करण्यात आली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक भरत जाधव, सहाय्यक निरीक्षक राजेश माळेगावे, अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, इम्रान नदाफ, तुषार भिवरकर, अमेय रसाळ, सागर केकान, राने, मनिषा पुकाळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.  (Latest Marathi News)

सुटका करण्यात आलेल्या तरुणींमध्ये मुंबईतील दोन आणि उत्तरप्रदेश, दिल्ली, पश्चिम बंगाल, गुजरात, मध्यप्रदेश, येथील तरुणींचा समावेश आहे. पोलिसांनी त्यांना रेस्क्यु होममध्ये भरती केले आहे. गेल्याच आठवड्यात पोलिसांनी राजस्थानी अभिनेत्रीसह दोन रशियन मुलींवर कारवाई केली होती.

याप्रकरणात गुन्हा नोंद करण्यात आला होता. हे एजंट परराज्यात राहून पुण्यात ऑनलाईनच्या माध्यमातून सेक्स रॅकेट चालवित होते. त्यांची चौकशी करत असताना बाणेरमधील दोन बड्या हॉटेलमध्ये हायप्रोफाइल सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्या माहितीवरून पोलिसांनी बनावट ग्राहक तयार करून त्यांच्याशी संपर्क साधला. तसेच, या माहितीची खातरजमा केली. त्यानूसार, मध्यरात्री बाणेर भागातील एका बड्या हॉटेलवर छापा टाकला. तेव्हा या हॉटलमध्ये ठेवण्यात आलेल्या ११ मुलींची सुटका करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

२, ३ की ४? घर बांधताना किती मजल्यांना मिळते परवानगी? जाणून घ्या काय आहेत बिल्डिंग बायलॉज नियम

Heart Failure ची सुरुवात कशी होते? छातीत दुखणं हे लक्षण नाही, डॉक्टरांनी सांगितली 7 संकेत

Maharashtra News Live Update: शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक

Marathi Actor : "सण साजरे करा, पण..."; DJ बंदीवर मराठमोळा अभिनेता स्पष्टच बोलला

Political News : विरोधक एकवटले, विजय थलपती यांचे सरकार कोसळणार? राजकीय क्षेत्रात हालचालींना वेग

SCROLL FOR NEXT