Pune Police Conduct Sting Operation Saam TV AI Photo
मुंबई/पुणे

Pune : पुण्यात पोलिसांनीच केले पोलिसांचे 'स्टिंग ऑपरेशन'! डमी डिलिव्हरी बॉय बनवून केला मोठा पर्दाफाश

Pune Police Sting Operation: पुणे पोलिसांनीच डमी डिलिव्हरी बॉयच्या माध्यमातून स्टिंग ऑपरेशन करत तक्रार नोंदवण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यावर कारवाई केली.

Akshay Badve

Pune Police Conduct Sting Operation : पुण्यात एका डमी डिलिव्हरी बॉयच्या स्टिंग ऑपरेशननंतर निष्काळजीपणा दाखवणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यावर पुणे पोलिस दलाने कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. तक्रारदाराची तक्रार नोंदवून घेण्याऐवजी त्यालाच फुकटचा सल्ला देऊन माघारी पाठवणे एका पोलिस कर्मचाऱ्याला भलतेच महागात पडले आहे. या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित कर्मचाऱ्याची दोन वर्षांसाठी वेतनवाढ रोखण्याची दंडात्मक कारवाई केली आहे. किसन साळुंके असे कारवाई झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून ते सध्या विमानतळ पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत.

नेमकं काय घडलं?

हा संपूर्ण प्रकार २१ जून रोजी घडला होता. त्यावेळी पोलिस कर्मचारी साळुंके हे मुंढवा पोलिस ठाण्यात कार्यरत होते. पुणे शहर पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिस ठाण्यांच्या कारभाराची पडताळणी करण्यासाठी एक 'डमी तक्रारदार' डिलिव्हरी बॉय म्हणून तयार केला आणि त्याला मुंढवा पोलिस चौकीत पाठवले. रॅश ड्रायव्हिंग करून मला शिवीगाळ व दमदाटी झाली, अशी तक्रार या डमी तक्रारदाराने मांडली. मात्र तेथील महिला पोलिस हवालदाराने तक्रार न घेता त्याला थेट मुंढवा पोलिस ठाण्यात जाण्यास सांगितले.

पोलीस कर्मचाऱ्याचा फुकटचा सल्ला भोवला!

त्यानंतर डमी तक्रारदाराने मुंढवा पोलिस ठाणे गाठले. तिथे ड्युटीवर असलेले कर्मचारी किसन साळुंके यांच्याकडे त्याने आपली आपबिती सांगितली. मात्र, तक्रार नोंदवून घेण्याऐवजी साळुंके यांनी, "डिलिव्हरी बॉयचे काम करताना जरा सावधानतेने गाडी चालवत जा," असा सल्ला देऊन तक्रारदाराची बोळवण केली आणि त्याला माघारी पाठवले.

वरिष्ठांची कारवाई; २ वर्षे वेतनवाढ बंद!

हा संपूर्ण प्रकार वरिष्ठांच्या थेट निदर्शनास आल्यानंतर कर्तव्यदक्षतेचा अभाव आणि बेजबाबदारपणा दाखवल्याप्रकरणी साळुंके यांना तात्काळ कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. त्यांनी दिलेला खुलासा अस समाधानकारक आढळल्याने, परिमंडळ ६ चे पोलिस उपआयुक्त जीवन बेनिवाल यांनी साळुंके यांची २ वर्षांसाठी वेतनवाढ स्थगित (शिक्षेची कारवाई) करण्याचे आदेश दिले आहेत. या धडक कारवाईमुळे पुणे पोलिस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Frequently Headache Problem: तुम्हालाही सतत डोकेदुखीचा त्रास आहे का? जाणून घ्या यामागची छुपी कारणे आणि घरगुती उपाय

Maharashtra News Live Update: सुप्रिया सुळे यांनी आंदोलन करणाऱ्या मुलींशी फोनवरून साधला संवाद

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत शिंदेंची मोठी घोषणा, मुख्यमंत्र्यांसमोरच स्पष्ट केली भूमिका

इंजिनिअरसह अख्ख्या कुटुंबाची गोदावरी नदीत उडी; 5 जणांच्या हत्येप्रकरणी कोचला अटक

Prajakta Mali Photos: प्राजक्ता माळीचे टॉप 10 फोटो, जे तुम्ही कधीच पाहिले नसतील

SCROLL FOR NEXT