Pune Police In Action Mode  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Police In Action Mode: ज्या ठिकाणी राडा त्याच ठिकाणी पोलिसांनी काढली धिंड! पुणे पोलिस अॅक्शन मोडवर

ज्या ठिकाणी राडा त्याच ठिकाणी पोलिसांनी काढली धिंड! पुणे पोलिस अॅक्शन मोडवर

साम टिव्ही ब्युरो

>> अक्षय बडवे

Pune Police In Action Mode : पुण्यात राडा संस्कृती ही वाढत चालली आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात गाड्यांची तोडफोड झाल्याच्या घटना घडताना दिसल्या आहेत. काही टोळक्यांमध्ये आपसात होणाऱ्या वादातून अशा घटना वारंवार घडत आहेत.

याचा मोठा त्रास सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. असेच प्रकार माेडीत काढण्यासाठी पाेलिसांनी कंबर कसली आहे. यातच चार दिवसांपूर्वी टोळक्यांनी ज्या ठिकाणी राडा घालत घोड्यांची तोडफोड केली होती, त्याच ठिकाणी पोलिसांनी आत त्यांची धिंड काढली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात सहकारनगर परिसरात चार दिवसांपूर्वी झालेल्या माेठ्या प्रमाणात गाड्यांची तोडफोड झाली हाेती. सहकारनगरमधील अरण्येश्वर परिसरात हा प्रकार घडला हाेता. दोन गटांमध्ये हाणामारी झाली होती. त्यातून गाड्यांची ताेडफाेड करण्यात आली हाेती. हे प्रकरण पाेलिसांपर्यंत पाेहचले हाेते.

परिसरात गाड्यांची तोडफोड केल्यामुळे सामान्य नागरिकांनी पोलिसांवर नाराजी व्यक्त केली होती. यातच पाेलिसांनी या प्रकरणी ३१ लोकांना अटक केली आहे. यानंतर आज यातील प्रमुख आरोपींची पोलिसांनी धिंड काढली.  (Latest Marathi News)

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार अरण्येश्वर परिसरामध्ये गाड्यांची तोडफोड झाली हाेती. या घटनेनंतर प्राथमिक तपासाअंती दोन्ही गटातील ३१ लोकांना अटक करण्यात आली आहे. या घटनेचा कसून तपास सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे यांची गाडी गावकऱ्यांनी अडवली

धक्कादायक! मजूर बापाकडे I-Phoneचा हट्ट, १६ वर्षीय तरुणानं आयुष्य संपवलं

Manoj jarange Patil: आरक्षणाचा तुकडाच पाडणार; आता २९ ऑगस्टला फाईटच, मनोज जरांगे कडाडले

शिव मंदिरात ३ वेळा टाळी का वाजवली जाते?

Nanded News: गावात भयंकर पुरस्थिती; पालकमंत्री लंडनहून सात दिवसानंतर पाहणीसाठी आले, गावकऱ्यांचा संताप अनावर|VIDEO

SCROLL FOR NEXT