PUNE CRIME NEWS: saam tv
मुंबई/पुणे

पुणे पोलिसांचा गुंडांना दणका! टोळीप्रमुखासह 10 सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी तडीपार

Pune Police Extern 10 History-Sheeters For Two Years: पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांची मोठी कारवाई. गुन्हेगारी टोळीच्या प्रमुखासह दहा सराईत गुन्हेगारांना पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले.

Omkar Sonawane

मागच्या काही वर्षांपासून पुण्यात मोठ्या प्रमाणात गुंडगिरी फोफावली आहे. दिवसाढवळ्या किरकोळ कारणावरून खुनाच्या घटना घडल्या आहेत. यामुळे पुणेकरांमध्ये भीतीचे साम्राज्य पसरले आहे. याच पार्श्वभूमीवर सणासुदीत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पुणे पोलिस अॅक्शनमोडवर आले आहेत.

शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी एका गुन्हेगारी टोळीच्या प्रमुखासह दहा सराईत गुन्हेगारांना पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. कात्रज, आंबेगाव, बिबवेवाडी आणि धनकवडी परिसरातील तडीपार केलेल्या या गुन्हेगारांवर खून, खुनाचा प्रयत्न,दरोडा, दरोड्याची तयारी, खंडणी उकळणे, बेकायदेशीर शस्त्रे बाळगणे, गंभीर दुखापत, अमली पदार्थांची विक्री, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे आणि दहशत माजवणे यांसारखे वेगवेगळे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

आंबेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आकाश ऊर्फ बटन प्रकाश बांडीलकर (वय २०), रामेश्वर लक्ष्मण करे (वय २५), गणेश तमाराम जाधव (वय २३, तिघे रा. कात्रज), आदित्य ऊर्फ सोन्या खंडू कांबळे (वय २३, रा. आंबेगाव खुर्द), बिबवेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अनिकेत विजय कोंढरे (वय २२, रा. लोअर इंदिरानगर), किरण दत्तात्रेय पांगारे (वय २३, रा. धनकवडी)

तसेच भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विकास अनिल जाधव (वय २८), विवेक रमेश शेवाळे (वय २४, दोघे रा. खोपडेनगर, कात्रज), गणेश ऊर्फ चिराग सचिन बडगुजर (वय २२, रा. भारतनगर, कात्रज), ओंकार अनंत बहिरट (वय २३, रा. गुजरवाडी, कात्रज) अशी तडीपार केलेल्या आरोपींची नावे आहेत. कॉर्डवरील सक्रिय गुन्हेगारांवर कठोर प्रतिबंधक कारवाया सुरू राहतील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank Holiday: बुधवारी बँका राहणार बंद, RBI ने सुट्टी का केली जाहीर?

Maharashtra News Live Update: उद्धव ठाकरे गटावर निलेश राणेंची टीका; दोन ठाकरे एकत्र आले तरी राजकीय फरक पडणार नाही

भुजिया खरेदीसाठी ट्रेनमधून उतरला अन् थेट पोलिसांच्या... टायगर श्रॉफ प्रकरणाची थरारक इनसाइड स्टोरी

Raw Vs Roasted Pumpkin Seeds: कच्चा की भाजलेल्या, कोणत्या भोपळ्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर

महापालिकांचे आयुक्त बदलले! IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

SCROLL FOR NEXT