Pune Ganesh Festival meta ai
मुंबई/पुणे

Pune News : बेस, टॉप ठीक पण प्रेशर मिड नाही! पुणे पोलिसांकडून डीजे- साऊंडचं टेस्टिंग, नियमावली तयार?

Pune News : DJ Sound मुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांची तयारी सुरू झाली आहे. Sound Testing नंतर नियमावलीबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.

Akshay Badve

गणेशोत्सवाला अजून काही दिवस बाकी आहेत असं असलं तरी सगळीकडे या उत्सवाची तयारी सुरू झाली आहे. गणेशोत्सव आणि या दरम्यान लावण्यात आलेला डी जे, या वादाचे समीकरण दरवर्षी ठरलेले आहे. गणेश मंडळांचा डी जे साठी हट्ट, पोलिस प्रशासनाकडून टाकण्यात आलेली कायद्याची चौकट आणि पर्यावरण प्रेमी यांच्याकडून याबाबत होणारा त्रास हे न सुटलेले कोडं पुन्हा एकदा समोर आले आहे.

वैभवशाली परंपरा लाभलेल्या पुण्यातील गणेशोत्सवात यंदा डी जे साउंड सिस्टिम वर निर्बंध येणार म्हणून अनेक गणेश मंडळांनी आक्षेप नोंदवला आहे तर दुसरीकडे या डी जे विरोधात कठोर पाऊलं उचलण्यात यावी अशी पर्यावरण प्रेमींची मागणी जोर धरू लागली आहे. अशातच आता पुणे पोलिसांनी गुरवारी थेट पोलिस आयुक्तालयात डी जे साउंड ची चाचणी म्हणजे अर्थात "टेस्टिंग" करण्यात आली. यावेळी पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सह आयुक्त संजय दराडे यांच्यासह वरिष्ट पोलिस अधिकारी तसेच पुणे साउंड अस्पेसिएशन चे अध्यक्ष बबलू रमजानी आणि इतर प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी साउंड सिस्टिम मधून येणारा आवाजाची पातळी डेसिबल मॉनिटर मशीन मधून मोजण्यात आली. किती स्पीकर लावले की त्याचा आवाजाची क्षमता कशी वाढते, तसेच संगीताच्या भाषेत "२ बेस, २ टॉप किंवा ४ बेस ४ टॉप मुळे आवाजात काय फरक पडतो याबद्दल आढावा घेण्यात आला. इतकचं नाही तर सध्या स्पीकर मध्ये अनधिकृतपणे लावण्यात आलेल्या "प्रेशर मिड" बद्दल सुद्धा पोलिसांनी माहिती घेतली.

"पर्यावरण कायदा आणि ध्वनी प्रदूषणाबाबत जो कायदा आहे आणि त्या अनुषंगाने जे डेसिबल ठरवून दिलेले आहेत त्याचे पालन येणाऱ्या उत्सवात व्हावं यासाठी आज साउंड सिस्टिम ची ट्रायल झाली. साउंड सिस्टिम चे प्रकार नेमके कोणते आहेत त्यात काय काय "कष्टमायझेशन" केले आहेत याबद्दल. चेकिंग केलं आहे त्याबद्दल सविस्तर चर्चा केली जाईल आणि निर्णय घेतला जाईल," अशी माहिती विशेष शाखेचे पोलिस उपआयुक्त, प्रशांत अमृतकर यांनी दिली.

"१० वर्षात साउंडबाबत उद्रेक झाला. लोकांना त्रास होतोय आम्हाला मान्य आहे पण या सिस्टिम मध्ये काय वापरल्यामुळे त्याचा लोकांना त्रास होतोय हे आम्ही आज सांगतोय. त्यासाठी आज इथे आम्ही ब्रँडेड साउंड सिस्टिम लावल्या आणि त्याचा आवाजाची मर्यादा तपासली गेली," अशी माहिती पुणे साउंड असोसिएशन चे अध्यक्ष बबलू रमजानी यांनी दिली.

"सध्या स्पीकर मध्ये "प्रेशर मिड" नावाची एक मशीन लावली जाते ज्याने क्षमतेपेक्षा मोठा आणि त्रास होईल असा आवाज केला जातो. या "प्रेशर मिड" लावल्यामुळे लोकांना त्रास होतो याबद्दल आम्ही संघटना म्हणून स्वतः विरोध करतोय. हे मशीन एका साउंड म्हणजे स्पीकर बॉक्स मध्ये फिट केलं जातं आणि असे अनेक बॉक्स लावले जातात जे घातक आहेत. आमचं या मशीन ला १ हजार टक्के विरोध आहे. जे प्रामाणिकपणे व्यवसाय करतात ते असे मशीन लावत नाहीत. आम्हाला कायद्याच्या चौकटीत राहून उत्सव साजरा करायचा आहे शेवटी आमचं पोट या व्यवसायावर आहे," असं सुद्धा ते पुढे म्हणाले.

नेमकं हे "प्रेशर मिड" काय भानगड आहे समजून घेऊया

सध्या डी जे साउंड मध्ये प्रेशर मिड नावाच्या मशीन चा वापर सर्रास ठिकठिकाणी केला जातोय. ही मशीन स्पीकर मध्ये लावल्यावर त्याचा आवाज इतरांपेक्षा जास्त असतो. या संदर्भातील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर सुद्धा व्हायरल झाले आहेत.

"एखाद्या कार्यक्रमात जेव्हा डी जे च्या साउंड सिस्टिम म्हणजेच स्पीकर मधून एकदम कर्कश आवाज येतो जो मूळ आवाजापेक्षा वेगळा आणि कानाला त्रास देणारा असतो तेव्हा या स्पीकर मध्ये "प्रेशर मिड" लावलेले असते. हे "प्रेशर मिड" एक यंत्र आहे जे तयार केलं जातं आणि अनेक स्पीकर मध्ये सहजपणे फिक्स केलं जातं. काही वेळा आपण जे लाकडी स्पीकर असतात त्यात तर ते अगदी सहजपणे लागू शकतं. हे यंत्र साउंड ड्रायव्हर म्हणून काम करतं जे साधारण स्पीकरच्या आवाजाच्या पातळीपेक्षा तिप्पट ते चौपट असतं," अशी माहिती एका साउंड सिस्टिम चालवणाऱ्या डी जे ने दिली.

"सगळेच प्रेशर मिड खराब असतात असं नाही. प्रेशर मिड बाबत काही प्रोटोकॉल आहेत. योग्य फ्रीकवेन्सी या प्रेशर मिड ची जुळवली गेली पाहिजे तसेच योग्य ती चांगली नेटवर्क प्लेट ज्याला योग्यरित्या कपॅसिटर लावले आहेत तेच वापरणे अपेक्षित आहे. सगळ्यात महत्वाचं एका बॉक्स मध्ये किती मिड फिट झाले पाहिजे या गोष्टींचे ज्ञान असेल तर त्याचा वापर व्यवस्थित नियमाच्या चौकटीत बसून केला जाऊ शकतो," असं मत एका साउंड व्यावसायिकाने व्यक्त केलं आहे.

रोहित शर्मा-शुभमन गिलचे तांडव! दोन्ही सलामीवीरांनी ठोकले वादळी शतक; विंडीजची पळता भुई थोडी

MPSC परीक्षार्थींसाठी सर्वात मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा;  ७ मोठे निर्णय

Kidney Failure Risk: तरूणांमध्ये किडनी फेलचा धोका का वाढतोय? ही लक्षणे दिसताच घ्या खबरदारी

'कौन बनेगा करोड़पती'च्या शुटिंगवेळी मोठा अपघात; अमिताभ बच्चन पाय घसरून पडले, बिग बींना उभंही राहता येईना

Latest Mangalsutra Designs For Woman: महिलांसाठी मंगळसूत्राचे लेटेस्ट 5 पॅटर्न्स, जे तुम्हालाही नक्की आवडतील

SCROLL FOR NEXT