bomb blast threat call Saam TV
मुंबई/पुणे

Breaking News: मुंबईसह, पुण्यात साखळी बॉम्बस्फोट होणार; पोलीस नियंत्रण कक्षाला फोन, यंत्रणांमध्ये खळबळ

bomb blast threat call: मुंबईसह पुण्यात साखळी बॉम्बस्फोट होणार, असा फोन शुक्रवारी (१६ फेब्रुवारी) पुणे पोलीस नियंत्रण कक्षाला आला. यामुळे यंत्रणांमध्ये एकच खळबळ उडाली.

Satish Daud

Pune Police bomb blast threat call

मुंबईसह पुण्यात साखळी बॉम्बस्फोट होणार, असा फोन शुक्रवारी (१६ फेब्रुवारी) पुणे पोलीस नियंत्रण कक्षाला आला. यामुळे यंत्रणांमध्ये एकच खळबळ उडाली. पोलिसांनी या फोन कॉलची गंभीर दखल घेत पुणे पोलिसांना सतर्क केले. मात्र, कुठलीही संशयित हालचाल आढळून न आल्याने पोलिसांनी फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू केला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारच्या सुमारास पुणे पोलीस नियंत्रण कक्षाला एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. मुंबईसह पुण्यातील काही भागात साखळी बॉम्बस्फोट होणार, अशी माहिती या व्यक्तीने पोलिसांना दिली. (Latest Marathi News)

मुंबईतील वांद्रे आणि गेट वे ऑफ इंडिया आणि पुण्यातील शिवाजीनगर आणि पिंपरी चिंचवड परिसरात लवकरच बॉम्बस्फोट होईल, असं अज्ञाताने पोलिसांना सांगितलं. तुम्ही कोण आणि कुठून बोलत आहात? अशी विचारणा पोलिसांनी (Police) केल्यानंतर अज्ञाताने फोन कट करून टाकला.

दरम्यान, पुणे पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत मुंबई पोलिसांना सतर्क केले. शुक्रवारी दिवसभर पाळत ठेवल्यानंतर संबधित भागात कुठलीही संशयित हालचाल आढळून आली नाही. त्यामुळे हा फोन कॉल फेक असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं.

याप्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला असून फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू केला आहे. मुंबई तसेच पुणे पोलिसांना असे फोन कॉल येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील मुंबईत बॉम्बस्फोट होणार अशा आशयाचे फोन पोलिसांना आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budget 2026 Live Updates: अर्थसंकल्प सादर होण्याआधीच शेअर मार्केट धडाम! सेनसेक्स, निफ्टीमध्ये घसरण

Gold Silver Rate Today: अर्थसंकल्पाआधीच गुडन्यूज! सोनं ₹१३००० तर चांदी २७००० रुपयांनी घसरली

Maharashtra Politics: भाजपचा हा सर्वात मोठा डाव, सुनेत्रा पवारांच्या शपथविधीनंतर बच्चू कडूंचं खळबळजनक विधान

Pakistan Blast : पाकिस्तान हादरले! १४ शहरात ४८ ब्लास्ट, १२० जणांचा मृत्यू, शेकडो गंभीर जखमी

Sangli Crime : पोटच्या मुलासमोरच वडिलांची दगडाने ठेचून हत्या; सांगलीत भररस्त्यात हत्याकांड

SCROLL FOR NEXT